
Accident News : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघातात माय-लेकींचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी आहेत. धुळे -सोलापूर महामार्गावर सौंदलगावजवळ हा भीषण अपघात झाला आहे. रोहिणी चव्हाण (29 वर्ष) आणि अडीच वर्षीय नूरवी चव्हाण यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये दोन पुरुषांसह तीन महिला आणि एका बाळाचा समावेश आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरचे चव्हाण कुटुंबीय सोमवारी सकाळी कारने बीडकडे निघाले होते. प्रवासादरम्यान भरधाव कारचं नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्याच जाऊन उलटली. अपघाता इतका भीषण होता की कारच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.
(नक्की वाचा- Pune News : सुनेची आत्महत्या, छळ केल्याचा आरोप; राष्ट्रवादीच्या नेत्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल))
अपघातानंतर मोठा आवाज झाल्यानंतर स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. नागरिकांनी अपघातातील जखमींना कारमधून बाहेर काढत जवळील रुग्णालयात दाखल केले.
अपघातात रोहिणी अमर चव्हाण आणि नुरवी या मायलेकीचा जागेवर मृत्यू झाला. तर कारमधील अमर बाबुराव चव्हाण, प्रदीप बाबुराव चव्हाण , विश्रांती प्रदीप चव्हाण, कमलबाई बाबुराव चव्हाण, रुद्रांश प्रदीप चव्हाण असे इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
(नक्की वाचा- वडिलांच्या अंत्यसंस्काराला लेक तातडीने निघाली, काळाने रस्त्यातच गाठलं; 5 जणांचा करूण अंत)
रत्नागिरीत कार नदीपात्रात कोसळली, 5 जणांचा मृत्यू
रत्नागिरीत वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाणाऱ्या मुलीसह अन्य चार जणांना काळाने रस्त्यातच गाठलं. पराडकर कुटुंब मुंबईतील मीरा रोड येथून देवरुख येथे अंत्यसंस्कारासाठी चाललं होतं. दरम्यान खेडमधील जगबुडी नदीजवळ त्यांची कार पुलावरून नदीपात्रात कोसळली. यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world