जाहिरात
This Article is From May 17, 2024

पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात, पुश बॅक टग धडकलं अन्...

पुण्याहून दिल्लीला जाणारे विमान रद्द झाल्याने प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय झाली.

पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात, पुश बॅक टग धडकलं अन्...
पुणे:

पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला 'पुश बॅक टग' (विमान ओढणे किंवा ढकलण्याचे वाहन) वाहनाची धडक बसल्याने मोठं नुकसान झालं आहे. या धडकेत विमानाच्या खालच्या बाजूस असलेल्या 'फ्युजलाज'ला मोठं भगदाड पडलं आहे. याशिवाय विमानाच्या पुढच्या टायरचे आणि पंखाच्या पत्र्याचेदेखील मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे एअर इंडियाला उड्डाण रद्द करावे लागले. या अपघातामुळे प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिल्लीला जाणारे विमान रद्द झाल्याने प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय झाली.

पुणे विमानतळावरून एअर इंडिया फ्लाइट क्रमांक एआय 858 गुरुवारी दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी दिल्लीसाठी रवाना होणार होते. ऐरोब्रिजला जोडलेले विमान प्रवासी बसल्यावर बाजूला झाले. या वेळी विमानाच्या खालच्या बाजूला 'पुश बॅक टग'ची मोठी धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, यात विमानाचा पत्रा कापला गेला अन् विमानाला भगदाड पडलं. ही घटना विमानाच्या अपघातश्रेणीमध्ये येते. 

नक्की वाचा - मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा ब्लॉक; वेळेत बदल, जाणून घ्या अपडेटेड वेळापत्रक

पुण्याहून एअर इंडियाच्या विमानाने सुमारे 160 प्रवासी दिल्लीला निघाले होते. विमान टॅक्सी ट्रॅकवरून धावपट्टीच्या दिशेने जाण्याआधीच विमानाचा असा अपघात झाला. धडक झाल्यावर मोठा आवाज आला. वैमानिकांनी तत्काळ विमानाची पाहणी केली. विमानाला भगदाड पडल्याचे लक्षात येताच उड्डाण रद्द करण्यात आलं. विमानाच्या पंखांचेदेखील नुकसान झाले आहे. पंख्यांमध्ये इंधन असते. मात्र वेळीच ही बाब लक्षात आल्याने मोठा धोका टळला आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com