3 minutes ago

Ajit Pawar Last Rites Updates: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (28 जानेवारी 2026) सकाळी विमान दुर्घटनेत निधन झाले. पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह अन्य चार जणांचाही मृत्यू झालाय. अजित पवार यांच्या अकाली झालेल्या निधनामुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांचे अंतिम दर्शन करण्यासाठी, लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी, अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून समर्थक तसेच नागरिकांनी गर्दी केलीय. बुधवारी संध्याकाळी काही वेळासाठी अजित पवार यांचे पार्थिव बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळेस तेथे जमलेल्या नागरिकांनी  'अजित दादा अमर रहे' आणि 'अजित दादा परत या' अशा घोषणा दिल्या. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील अंत्यसंस्कार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिलीय.

Jan 29, 2026 10:44 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीमध्ये दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीमध्ये दाखल, अजित पवार यांचे थोड्याच वेळात अंत्यदर्शन घेणार.

Jan 29, 2026 10:39 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले

Jan 29, 2026 10:38 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी

Jan 29, 2026 10:37 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत विद्या प्रतिष्ठान मैदानात दाखल

Advertisement
Jan 29, 2026 10:36 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान मैदानात रवाना

Jan 29, 2026 10:35 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates:राजकीय नेते मंडळी विद्या प्रतिष्ठान मैदानात दाखल

Advertisement
Jan 29, 2026 10:32 (IST)

Ajit Pawar funeral ajit pawar last rites Emotional Viral Video from Baramati Medical College

Ajit pawar Death: अजितदादांचं पार्थिव बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आला होता, तिथून एक अत्यंत भावूक व्हिडिओ समोर आला आहे.

Jan 29, 2026 10:32 (IST)

Baramati News DCM Ajit Pawar last rites: leaves from his Katewadi residence to Vidya Pratishthan ground

गर्दीमुळे पवार बंगल्याचे गेटही लागत नव्हते. 10- 12  पोलीस गेट लावण्याचा प्रयत्न करत होते. आमदार रोहित पवार हे वारंवार समुदायाला शांततेचे आवाहन करत होते.

Advertisement
Jan 29, 2026 10:14 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: भाजप आमदार सुरेश धस अजित पवारांच्या अंत्यदर्शनाला दाखल

Jan 29, 2026 10:13 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले

Jan 29, 2026 10:10 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अजित पवारांचे कार्य, त्यांची प्रेरणा आम्हाला कायम दिशा देणारी ठरणार आहे : धीरज देशमुख, नेते काँग्रेस

Jan 29, 2026 10:09 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान मैदानाकडे रवाना

Jan 29, 2026 10:08 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: "अजित दादा अमर रहे" समर्थकांच्या घोषणा

Jan 29, 2026 10:07 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अजित पवार यांना शासकीय मानवंदना

Jan 29, 2026 10:06 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान मैदानाकडे रवाना

Jan 29, 2026 10:06 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान मैदानाकडे रवाना

Jan 29, 2026 10:05 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बारामतीकडे रवाना

Jan 29, 2026 09:51 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानकडे रवाना

गर्दी आवरणं नियंत्रणाबाहेर जात असल्याने अजित पवारांचे पार्थिव थेट विद्या प्रतिष्ठानकडे रवाना

Jan 29, 2026 09:49 (IST)

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे विद्या प्रतिष्ठान मैदानात दाखल

Jan 29, 2026 09:46 (IST)

आमचा नेता आम्हाला सोडून गेला हे आमचं दुर्दैव आहे : प्रताप पाटील चिखलीकर, NCP नेता

Jan 29, 2026 09:44 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अजित पवार यांच्या पार्थिवाच्या अंत्ययात्रेचा मार्ग खालीलप्रमाणे असेल

काटेवाडी येथील निवासस्थानाहून  

गदिमा सभागृह

विद्यानगरी चौक

भिगवण रस्ता

विद्या प्रतिष्ठान मराठी शाळा रस्ता

विद्या प्रतिष्ठान मैदान

Jan 29, 2026 09:40 (IST)

Ajit Pawar Last Rites Live: थोड्या वेळात अंत्ययात्रेला होणार सुरुवात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शासकीय मानवंदना दिली जात आहे. 

Jan 29, 2026 09:37 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: DGCA and फॉरेन्सिक टीमचे अधिकारी दुर्घटनास्थळी दाखल

Jan 29, 2026 09:36 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: जनतेच्या हितासाठी, जनतेसाठी काम करणाऱ्या नेत्याला आपण गमावलंय: विजय वडेट्टीवार

जनतेच्या हितासाठी, जनतेसाठी काम करणाऱ्या नेत्याला आपण गमावलंय: विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते

Jan 29, 2026 09:33 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: CM देवेंद्र फडणवीस आणि DCM एकनाथ शिंदे बारामतीकडे रवाना

Jan 29, 2026 09:33 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: CM देवेंद्र फडणवीस आणि DCM एकनाथ शिंदे बारामतीकडे रवाना

Jan 29, 2026 09:31 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: NCP-SCP प्रमुख शरद पवार विद्या प्रतिष्ठान मैदानात दाखल

Jan 29, 2026 09:21 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates :मनसे अध्यक्ष राज ठाकरे बारामतीत दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे काटेवाडी येथील अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल 

Jan 29, 2026 09:18 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: शरद पवार विद्या प्रतिष्ठान येथे दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे (राशप) प्रमुख शरद पवार काटेवाडी येथे अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि आता विद्या प्रतिष्ठान येथे दाखल झाले आहेत. 

Jan 29, 2026 09:09 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: DCM एकनाथ शिंदे बारामतीकडे रवाना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदनवन बंगल्यातून बारामतीकडे रवाना

Jan 29, 2026 08:53 (IST)

अजित पवार यांच्यासारखा नेता होणे नाही, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

Jan 29, 2026 08:50 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: शरद पवार काटेवाडीच्या दिशेने रवाना

शरद पवार यांच्या गोविंद बाग येथील निवासस्थानावरून काटेवाडीकडे रवाना झाले आहेत

Jan 29, 2026 08:50 (IST)

Vidip Jadhav: अजित पवार यांचे बॉडीगार्ड विदीप जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्या पार्थिवावर सातारा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Jan 29, 2026 08:46 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अजित पवार यांचे पुत्र जय पवार काटेवाडीतील निवासस्थानी दाखल

Jan 29, 2026 08:45 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अजित पवार यांच्या पार्थिवावर सकाळी 11 वाजता होणार अंत्यसंस्कार

Jan 29, 2026 08:37 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अजित पवारांसाठी समर्थकांची गर्दी

अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी काटेवाडीतील बंगल्याबाहेर समर्थकांची मोठी गर्दी 

Jan 29, 2026 08:34 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: "अजितदादा पवार पवार लाडके लोकनेते"

अजितदादा पवार पवार लाडके लोकनेते होते. त्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेने महाराष्ट्राच्या विकासासाठी सतत प्रयत्न केले. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याची मोठी हानी झाली आहे, जैन दिगंबर पंथ राष्ट्रीय संत आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी शोक व्यक्त केला.

Jan 29, 2026 08:30 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: गर्दीला शांत करण्यासाठी प्रयत्न

बारामती : विद्या प्रतिष्ठान मैदानात जमलेल्या गर्दीला शांत करण्यासाठी आमदार रोहित पवार यांचा प्रयत्न

Jan 29, 2026 08:28 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अजित पवारांच्या निवासस्थानी नातेवाईक दाखल

Jan 29, 2026 08:26 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराची तयारी

Jan 29, 2026 08:05 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीमध्ये दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीमध्ये दाखल

Jan 29, 2026 08:01 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: बारामती विमानतळ परिसरात कडेकोट बंदोबस्त

Jan 29, 2026 07:58 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: दुर्घटनास्थळावरील दृश्य

Jan 29, 2026 07:47 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: बारामती विमानतळ परिसरात छावणीचे स्वरूप

बारामती विमानतळ परिसरात छावणीचे स्वरूप

Jan 29, 2026 07:45 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीच्या दिशेने रवाना

Jan 29, 2026 07:40 (IST)

Maharashtra ZP Elections 2026 to Proceed as Scheduled Despite 3-Day Mourning for Ajit Pawar

Ajit Pawar Death News: अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्य सरकारने 28 ते 30 जानेवारी दरम्यान तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.

Jan 29, 2026 07:35 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी समर्थकांची गर्दी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार वडिलांच्या अंत्यसंस्कारांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल.

Jan 29, 2026 07:32 (IST)

Ajit Pawar Death News: मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या त्यांच्या 'चार्टर्ड प्लेन'ला तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला. आज, 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

Jan 29, 2026 07:30 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानात अंत्यसंस्काराची तयारी सुरू

Jan 29, 2026 07:27 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीच्या दिशेने रवाना

अजित पवार यांचे पार्थिव रुग्णालयातून काटेवाडीच्या दिशेने रवाना

Jan 29, 2026 07:18 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: काटेवाडी येथे श्रीनिवास पवार आणि युगेंद्र पवार दाखल

काटेवाडी येथे श्रीनिवास पवार आणि युगेंद्र पवार दाखल

Jan 29, 2026 07:16 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अपघात प्रकरणाचा तपास CIDकडे वर्ग केले जाण्याची शक्यता

उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी पोलिसांत नोंद

अकस्मात मृत्यूची नोंद

CIDकडे तपास वर्ग केले जाण्याची शक्यता 

Jan 29, 2026 07:15 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: खासदार सुप्रिया सुळे काटेवाडी येथील पवार बंगल्यावर दाखल

खासदार सुप्रिया सुळे काटेवाडी येथील पवार बंगल्यावर दाखल

Jan 29, 2026 07:13 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराची तयारी

Jan 29, 2026 06:50 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: बारामतीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात

  • अजित पवार यांच्या अंतिम दर्शन घेण्यासाठी गावखेड्यातून लोक येण्यास सुरुवात 
  • कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्राभरातील विविध पोलिसांच्या तुकड्या या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत 

Jan 29, 2026 06:47 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अजित पवार यांचे समर्थक दाखल होण्यास सुरुवात

Jan 29, 2026 06:43 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी तयार असलेला ताफा बारामती विमानतळावर दाखल

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंतिम दर्शन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बारामतीत येणार

- बारामती विमानतळ येथून विद्या प्रतिष्ठानकडे रवाना होणार

Jan 29, 2026 06:40 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: बारामती विमानतळावर कडेकोट पोलीस बंदोबस्त

- बारामती विमानतळावर कडेकोट पोलीस बंदोबस्त 

- VIP व्यक्तींच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर बंदोबस्त

- NDRF पथक देखील विमानतळावर दाखल 

Jan 29, 2026 06:36 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अजित पवार यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार

Jan 29, 2026 06:35 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली

Jan 29, 2026 06:28 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: जून 1991मध्ये अजित पवार यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळेचे फोटो

Jan 29, 2026 06:25 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: आता आमची बारामती संपलीय,असं वाटतंय. कारण आमचा नेताच गेलाय : योगेश नाळे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते

Jan 29, 2026 06:22 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अजित पवार यांचे अकाली निधन, महाराष्ट्रावर शोककळा

Jan 29, 2026 06:19 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: महाराष्ट्राचे मोठं नुकसान झालंय:मंत्री उदय सामंत

Jan 29, 2026 06:18 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार

सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Jan 29, 2026 06:17 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: सकाळी 9 वाजता निघणार अंत्ययात्रा

सकाळी 9 वाजता ग.दि.मा. सभागृहापासून अंत्ययात्रा निघणार आहे.

Jan 29, 2026 06:00 (IST)

Ajit Pawar Death News No Holiday For School Pune Mumbai Maharashtra During State Mourning Period

Ajit Pawar Death School Holiday: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत, पण खरंच सुटी आहे का?

Jan 29, 2026 05:53 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: अजित पवार यांचे पार्थिव 7 वाजता काटेवाडीत आणले जाणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव सकाळी 7 वाजेपर्यंत काटेवाडी येथील निवासस्थानी आणले जाणार आहेत. काटेवाडी येथील पवार बंगल्यावर अजित पवार यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवले जाईल. साधारणपणे दीड तास अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडी येथे असेल. त्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे.

Jan 29, 2026 05:48 (IST)

Ajit Pawar Death: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर

Jan 29, 2026 05:44 (IST)

Ajit Pawar Last Rites Updates: राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.