जाहिरात

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनानंतर 10 प्रश्न अनुत्तरित; कुटुंबीय, सहकाऱ्यांसह सगळेच चिंतेत  

Ajit Pawar Death News: मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या त्यांच्या 'चार्टर्ड प्लेन'ला तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला. आज, 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनानंतर 10 प्रश्न अनुत्तरित; कुटुंबीय, सहकाऱ्यांसह सगळेच चिंतेत  

 Ajit Pawar Plan Crash News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या धक्कादायक बातमीमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. 'अजितदादा' म्हणून ओळखले जाणारे एक खंबीर नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले असून, त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या त्यांच्या 'चार्टर्ड प्लेन'ला तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला. आज, 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

(नक्की वाचा- Ajit Pawar : 66 वर्षे 6 महिने 6 दिवस! अजित पवारांना 6 च्या फेऱ्याने घेरलं; 6 आकडा अन् मृत्यूचा काय आहे संबंध?)

अजित पवारांच्या निधानंतर निर्माण झालेले प्रश्न

  1. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) भवितव्य काय?
  2. अजित पवारांनंतर पक्षाची धुरा कोणाकडे जाणार? 
  3. सुनेत्र पवार आणि त्यांची मुले राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे हाती घेणार का?
  4. शरद पवार पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सूत्रे हाती घेऊन दोन्ही गट एकत्र आणणार की पक्षात पुन्हा फूट पडणार? यावर चर्चा सुरू झाली आहे.
  5. सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार यांच्याकडे पक्षाची जबाबदारी सोपवली जाणार का?
  6. भाजप आणि शिंदे गट आता अजित पवारांच्या जागी कोणाची वर्णी लावणार?
  7. ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा सक्रिय होऊन विखुरलेला पक्ष एकत्र आणू शकतात?
  8. अजित पवारांनंतर पिढीतील रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या राजकीय जबाबदाऱ्या वाढतील?
  9. बारामतीमधील तरुण नेतृत्व म्हणून युगेंद्र पवार यांच्याकडे जबाबदारी येईल?
  10. भाजपला आता राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) आमदारांना सोबत ठेवण्यासाठी नवीन धोरण आखावे लागेल?

पाहा VIDEO

Listen to the latest songs, only on JioSaavn.com