जाहिरात

Ajit Pawar Death School Holiday: शाळांना आज आणि उद्या सुटी आहे का? नेमकं काय आहे सत्य, एका क्लिकवर वाचा माहिती

Ajit Pawar Death School Holiday: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत, पण खरंच सुटी आहे का?

Ajit Pawar Death School Holiday: शाळांना आज आणि उद्या सुटी आहे का? नेमकं काय आहे सत्य, एका क्लिकवर वाचा माहिती
Ajit Pawar Death: आज आणि उद्या शाळांना सुटी आहे का?

Ajit Pawar Death School Holiday: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (28 जानेवारी) सकाळी विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या अकाली झालेल्या निधनामुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बारामतीला रवाना झाले होते. अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बुधवारी (28 जानेवारी 2026) शासकीय सुटी जाहीर करण्यात आली होती तसेच तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. दरम्यान सोशल मीडियावर शाळांना 29 जानेवारी आणि 30 जानेवारी रोजी सुटी असल्याचे मेसेज व्हायरल झाल्याने पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. पण आज आणि उद्या राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अधिकृतरित्या सुटी जाहीर करण्यात आलेली नाही. शासनाकडून अधिकृतरित्या कोणतेही आदेश शाळांना देण्यात आलेले नाहीत. पुणे महानगरपालिका प्रशासनानंही बुधवारी स्पष्ट केले की, 29 जानेवारी आणि 30 जानेवारी रोजी शाळांना सुटी देण्याचे कोणतेही आदेश मिळालेले नाहीत. शिक्षण विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी गुरुवारपासून वर्ग नेहमीप्रमाणे भरतील, असे स्पष्ट केलंय

राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य शासनाने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मुंबई येथील लोकभवनातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला. अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळवण्यात आले आहे.

(नक्की वाचा: Ajit Pawar Bodyguard: सावलीप्रमाणे अजित पवारांसोबत राहायचे, बॉडीगार्ड विदीप जाधव यांच्या शेजाऱ्यांची मोठी मागणी)

या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बुधवार (28 जानेवारी 2026) राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद राहतील, असे कळवण्यात आले होते. 

(नक्की वाचा: Ajit Pawar Plane Crash: जानेवारीत विमान दुर्घटना, राजकीय प्रमुख व्यक्तीच्या मृत्यूची शक्यता, ज्योतिषींनी वर्तवलं होतं भाकित)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com