
Ajit Pawar News : पुण्यातील वाहतूक कोंडी नेहमीच चर्चेचा विषय असते. शहरात सुरु असलेली विकासकामे, वाढती लोकसंख्या त्यामुळे वाढलेली वाहनांची संख्या, तसेच वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचं होणाारा भंग यामुळे या वाहतूक कोडींत आणखीच भर पडते. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार मैदानात उतरले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यातील वाहतूक कोंडीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत बैठक घेतली. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पायाभूत सुविधांच्या कामाचा वेग वाढवा, अशा सूचना अजित पवारांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.
(नक्की वाचा- Mumbai Pune Missing Link: मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक बाबत मोठी बातमी, कधी होणार सुरू?)
पुणे शहरासह उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे रिंग रोडसह, मेट्रो, उड्डाणपूल या सुरू असलेल्या कामांना गती देण्याच्या अजित पवारांनी सूचना दिल्या आहेत. यासाठी या प्रकल्पांशी संबंधित सर्व विभागाने योग्य समन्वय आणि ताळमेळ राखत पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
(नक्की वाचा- Pahalgam Video: पहलगाम हल्ल्याचा सर्वात भयानक Video समोर, गोळ्या लागत होत्या, लोक कोसळत होते)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की, राज्यात सुरु असणाऱ्या विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत वाढ होऊन राज्याचे दीर्घकालीन नुकसान होते, ते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा.
अजित पवार यांनी यावेळी लोणावळा येथील नियोजित स्काय वॉक, टायगर पॉईंट, पुणे नाशिक ग्रीन फिल्ड सेमी हायस्पीड रेल्वे, ‘सारथी'संस्थेच्या नाशिक, कोल्हापूर, नागपूर, खारघर, संभाजीनगर, अमरावतीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, सातारा सैनिक स्कूल, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, वडाळा येथील जीएसटी भवन, रेडिओ क्लब मुंबई, रत्नागिरीचे मिरकरवाडा बंदर, वढू व तळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक, पुणे येथील वीर वस्ताद लहूजी साळवे स्मारक, कृषीभवन, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, पुरंदर विमानतळ आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world