बारामतीत युगेंद्र पवारांचा भावी नाही तर 'फिक्स आमदार' अशा आशयाचा फ्लेक्स लागला आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने हा फ्लेक्स लागला असून तो फ्लेक्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
गेल्या काही दिवसापासून अजित पवारांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार लढणार असल्याची चर्चा आहे. युगेंद्र पवारांना उमेदवारी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. तसेच जयंत पाटील यांनी देखिल युगेंद्र पवारांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. त्यानंतर दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवारांचा हा फ्लेक्स सगळयांचे लक्ष वेधून घेत आहे.
नक्की वाचा - नगरसेवक ते खासदार; एकेकाळी शरद पवारांचे निकटवर्तीय, वसंत चव्हाणांनी कठीण काळात काँग्रेसला जिंकवलं!
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचं प्लानिंग सुरू झालं आहे. त्यांच्या मास्टर प्लानच्या केंद्रस्थानी युगेंद्र पवारांचं नाव आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार हे अजित पवारांसाठी मोठं आव्हान ठरू शकतं. कथितपणे अजित पवारांनी आपले काका शरद पवारांना धक्का देत त्यांचा पक्ष, चिन्ह मिळवलं; त्याच अजित पवारांना आता त्यांचा सख्खा लहान भाऊ श्रीनिवास यांचा पूत्र युगेंद्रकडून आव्हान मिळू शकतं. सुप्रिया सुळे यांना बारामतीत लोकसभा निवडणुकीदरम्यान अजित पवारांच्या बारामती विधानसभेत मोठी मतं मिळाली होती. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंसाठी युगेंद्र पवारांनी मोठा प्रचार केला होता.