
Ajit Pawar Speech : राज्यातील सहकार संस्थाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं भाष्य केलं आहे. सरकार संस्था अडचणीत आल्यास संचालक बोर्डाकडून त्याची वसुली केली पाहिजे. सहकारी मंत्री कोणत्या बाजूला आहेत, तिथे ही मंडळी जातात आणि कारवाई थांबते. माझे मत कोणत्याही पक्षात जावो, पण दोषी संचालकांवर यावर कारवाई करा, असं मतं अजित पवार यांनी व्यक्त केलं. राज्य सहकारी बँकेने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या 'सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण' या विषयावरील परिसंवादात अजित पवार बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजित पवार यांनी याबाबत म्हटलं की, "सहकार क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत, अजूनही व्हावेत अशी अनेकांची अपेक्षा आहे. संस्थेने चांगला नफा कमावल्यानंतर संचालक मंडळालाही काहीतरी मिळाले पाहिजे असे विद्याधर अनास्करांनी मत मांडले. अशावेळी संस्था अडचणीत आणण्याचे काम संचालक मंडळ करते, तेव्हा त्यांच्याकडून काहीतरी वसूल केलं पाहिजे मात्र ते होतच नाही."
(नक्की वाचा- Political News : कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; सतेज पाटलांचे खंदे समर्थक शिवसेनेच्या वाटेवर?)
"संस्था अडचणी आल्या की कालांतराने चौकशीला स्थगिती मिळते. संचालक बोर्ड सत्ता कोणाची आहे ते बघतं. सहकारमंत्री ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाकडे जातात आणि स्थगिती आणतात. माझं तर देवेंद्रजी स्पष्ट मत आहे की अशा पद्धतीने चुकीने वागणारी लोकांनी उद्या सत्ताधारी पक्षात येण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना थांबवलं पाहिजे."
"पक्षात घेतलं तरी त्यांच्यावर पुढची कारवाई झाली पाहीजे. मग हे सगळे सुतासारखे सरळ होतील. प्रत्येकाला वाटतं की आपण तिकडं प्रवेश केलं की आपलं काम झालं. आता स्थगिती मिळेल, हे बरोबर नाही. ज्यांनी चुका केल्या, त्यालाच त्रास झाला पाहिजे. चांगलं काम करणाऱ्यांना त्रास होता कामा नये", असं अजित पवार यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- 'शरद पवारांचे राजकारण वेगळं, त्यांच्याशिवाय आमचा संघर्ष ...' संजय राऊतांचे मोठे विधान)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या परिसंवादात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world