जाहिरात

बारामतीत अजित पवार गटाकडून युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांना दमबाजी, शर्मिला पवारांचा आरोप

मुद्दाम आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये कुठलेही तथ्य नसून  विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आम्ही कोणतीही तक्रार पोलीस किंवा निवडणूक आयोगाकडे करणार नसल्याचंही किरण गुजर यांनी म्हटलं. 

बारामतीत अजित पवार गटाकडून युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांना दमबाजी, शर्मिला पवारांचा आरोप

देवा राखुंडे, बारामती

बारामतीत विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार हा वाद मतदानाच्या दिवशीही दिसून आला. अजित पवार गटाकडून युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचा आरोप शर्मिला पवारांनी केला आहे. निवडणूक आयोगाकडे आणि पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचंही शर्मिला पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार गटाने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत.

शर्मिला पवार यांना केलेल्या आरोपांनुसार, शहरातील महात्मा गांधी बालक मंदिर बूथमध्ये अजित पवार गटाकडून युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांना दमबाजी केली जात असल्याचा आरोप  युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवार यांनी केला आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी कुणालाही धमकी दिलेली नाही. शर्मिला ठाकरे यांचे आरोप खोटे आहेत. त्यांनी तक्रार केली असेल तर पोलीस आणि निवडणूक आयोग योग्य चौकशी करतील. 

(नक्की वाचा-  "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांच्या समर्थकला पोलिसांसमोर धमकी)

युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवार यांनी मतदान केंद्रामध्ये जाऊन खोट्या घड्याळाचा शिक्का मारलेल्या बनावट स्लिप्स आणल्या. हा त्यांच्याकडून रडीचा डाव सुरू आहे. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झालो आहोत, असं अजित पवार गटाचे किरण गुजर यांनी म्हटलं. 

मुद्दाम आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये कुठलेही तथ्य नसून  विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आम्ही कोणतीही तक्रार पोलीस किंवा निवडणूक आयोगाकडे करणार नसल्याचंही किरण गुजर यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा - 35 वर्ष जुना शर्ट घालून हितेंद्र ठाकूर यांनी केलं मतदान, काय आहे कारण?)

इंदापूरमध्ये शरद पवार गट-अजित पवार गटात राडा

इंदापूरमध्ये देखील शरद पवार गट आणि अजित पवार गटात राडा झाला. इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गावामध्ये मतदान करायच्या वेळेस दत्तात्रय भरणे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचा व्हिडीओ  समोर आला आहे. लाखेवाडी मतदान केंद्रावर संबंध नसलेली व्यक्ती भरणे यांच्या गटाकडून सहभागी झाला, असा आरोप या व्हिडीओमध्ये केल्याचं दिसून येत आहे.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com