मनोज सातवी, वसई
बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. हितेंद्र ठाकूर यांनी आमदार क्षितीज ठाकूर, पत्नी आणि इतर कुटुंबीयांसह आज विरार पश्चिमेच्या नेहरू जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदानाचा हक्क बजावला. हितेंद्र ठाकूर यांनी आज 35 वर्ष जुना शर्ट घालून मतदान केलं.
हितेंद्र ठाकूर 1990 पासून मतदानासाठी एकच शर्ट घालतात. हा शर्ट त्यांच्यासाठी लकी असल्याचं त्यांच्या पत्नी प्रवीण ठाकूर यांनी सांगितलं. तर या शर्टचा कपडा चांगला आहे, कंपनीचं कौतुक आहे. शर्ट कुणी दिला आठवत नसल्याचंही हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- MNS Letter : बनावट पत्राने वरळीत मनसेचं टेन्शन वाढलं, काय आहे पत्रात?)
मागील पाच वर्षांपासूनचं राजकारण घृणास्पद
जेव्हापासून मला मतदानाचा हक्क मिळाला तेव्हापासून मी न चुकता मतदान करत आहे. सध्या जे राजकारण सुरु आहे ते मला आवडत नाही. पैसे वाटणे, कुटुंबियामध्ये फुट पाडणे, पक्षामध्ये फुट पाडणे असं सगळं सुरु आहे.. विरोधात राहूच शकत नाही का? विरोधातही राहिलं पाहिजे. मागील पाच वर्षातील राजकारण घृणास्पद बनलं आहे. मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करुन योग्य उमेदवार निवडणूक आणणे गरजेचं आहे.
(नक्की वाचा- हा 'नोट जिहाद' आहे का? ठाकरेंचा शिंदे-पवार-फडणवीसांना सवाल)
कोण आहेत हितेंद्र ठाकूर?
हितेंद्र ठाकूर पहिल्यांदा 1990 साली विधानसभा निवडणुकीत वयाच्या 29 व्या वर्षी काँग्रेसकडून विजयी झाले. त्यानंतर त्यांनी वसई विकास मंडळ नावाचा आपला राजकीय पक्ष स्थापन केला, जो बहुजन विकासात आघाडीत नंतर बदलला गेला. त्यानंतर बहुजन विकास आघाडीकडून तीन वेळी ते निवडून विधानसभेत गेले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world