जाहिरात

"तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांच्या समर्थकला पोलिसांसमोर धमकी

Sameer Bhijbal Vs Suhas Kande : मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी समीर भुजबळ आणि सुहास कांदे समोरासमोर आले. नांदगाव - मनमाड रस्त्यावर हा सर्व प्रकार घडला.  

"तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांच्या समर्थकला पोलिसांसमोर धमकी

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. नाशिकमधील  बहुचर्चित नांदगाव मतदारसंघात समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात जोरदार राडा पाहायला मिळाला. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यावेळी विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांच्या समर्थकाला 'तुझा मर्डर फिक्स' अशी धमकी दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी समीर भुजबळ आणि सुहास कांदे समोरासमोर आले. नांदगाव - मनमाड रस्त्यावर हा सर्व प्रकार घडला.  

(नक्की वाचा - 35 वर्ष जुना शर्ट घालून हितेंद्र ठाकूर यांनी केलं मतदान, काय आहे कारण?)

गुरुकुल कॉलेज परिसरातून मतदार मतदानाला निघाले होते. मात्र समीर भुजबळांनी गाड्या आडव्या लावत या मतदारांना अडवले. मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप समीर भुजबळ यांनी केला. तर सुहास कांदे यांनी मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी व्यवस्था केल्याचे सांगितले.

यावरून दोन्ही गटात बाचाबाची सुरु झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र सुहास कांदे आणि समीर भुजबळ देखील यावेळी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सुहास कांदे यांनी भुजबळ्यांच्या समर्थकला तुझा मर्डर फिक्स अशी जीवे मारण्याची धमकी दिली. 

(नक्की वाचा-  MNS Letter : बनावट पत्राने वरळीत मनसेचं टेन्शन वाढलं, काय आहे पत्रात?)

भुजबळ-कांदे राडा प्रकरणी गुन्हा दाखल

समीर भुजबळ आणि सुहास कांदेंमध्ये झालेल्या राडा प्रकरणाची दखल जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली आहे. दोन्ही उमेदवारांना समजवण्यात निवडणूक अधिकाऱ्यांना यश आलं असून परिस्थिती नियंत्रणात आहे. नाशिक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. याप्रकरणी निवडणूक प्रक्रिया अंतर्गत तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com