जाहिरात

समाजकंटकांनी शौचालयाचे दरवाजे तोडले, अंबरनाथमधील ताडवाडीतील दुमजली शौचालयात संतापजनक प्रकार

अंबरनाथच्या ताडवाडी परिसरात पालिकेचं दुमजली शौचालय आहे. या शौचालयाची डागडुजी करण्याच्या मागणीसाठी मनसेनं उपोषण देखील केलं होतं.

समाजकंटकांनी शौचालयाचे दरवाजे तोडले,  अंबरनाथमधील ताडवाडीतील दुमजली शौचालयात संतापजनक प्रकार

निनाद करमरकर, अंबरनाथ

अंबरनाथमध्ये अज्ञात समाजकंटकांनी सार्वजनिक शौचालयाचे दरवाजे तोडल्याची घटना घडली आहे. यामुळे स्थानिकांची मोठी गैरसोय होत असून पालिका निवडणूक जवळ आल्यानेच हा प्रकार घडल्याचा संशय मनसेचे स्थानिक माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनी व्यक्त केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अंबरनाथच्या ताडवाडी परिसरात पालिकेचं दुमजली शौचालय आहे. या शौचालयाची डागडुजी करण्याच्या मागणीसाठी मनसेनं उपोषण देखील केलं होतं. त्यानंतर पालिकेनं या शौचालयाची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करून नवे दरवाजे बसवले होते. 

ट्रेंडिंग बातमी - विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेना -राष्ट्रवादीला नाहीच? भाजपचा उमेदवारही ठरला?

हेच दरवाजे अज्ञात समाजकंटकांनी तोडले आहेत. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते आहे. नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. याबाबत मनसेचे स्थानिक माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - विरोधकांचा आमदारकीची शपथ घेण्यास नकार का? पहिल्याच दिवशी पेच

पालिका निवडणूक जवळ आली असून त्यामुळे कुणीतरी जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचा आरोप बागुल यांनी केला असून यामुळे त्रास मात्र नागरिकांनाच होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर स्थानिकांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com