
Arjun Tendulkar News: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर साखरपुडा झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रसिद्धी मीडियासमोर आला. अर्जुनने प्रसिद्ध उद्योजक कुटुंबातील लेक सानिया चंडोकसोबत (Saaniya Chandhok) साखरपुडा केल्याचे वृत्त 13 ऑगस्ट रोजी सोशल मीडियाद्वारे समजले होते. अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडला होता. साखरपुड्यानंतर अर्जुन तेंडुलकर 27 ऑगस्ट 2025 गणेश चतुर्थीदिवशी पहिल्यांदाच प्रसिद्धी मीडियासमोर आला होता.

Photo Credit: PTI
अर्जुन तेंडलुकरने सहकुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
यानंतर 28 ऑगस्ट रोजी सचिन तेंडुलकरने सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले, त्यावेळेस अर्जुन तेंडुलकर देखील लालबागच्या राजा चरणी नतमस्तक झाला.

Photo Credit: Varinder Chawla
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी कोण आहे?
अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar Gets Engaged To Saaniya Chandok) सानिया चंडोकसोबत साखरपुडा केला. अर्जुनची होणारी पत्नी सानिया पाळीव प्राण्यांच्या देखभाल उद्योग क्षेत्राशी संबंधित असल्याचे म्हटलं जातंय. तसेच सानिया ही प्रसिद्ध व्यावसायिक रवी घई यांची नात आहे.

Photo Credit: Varinder Chawla
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोकच्या साखरपुड्याचे फोटो दोनही कुटुंबीयांनी सोशल मीडियावर शेअर करणे टाळलंय.
(नक्की वाचा: Sachin Tendulkar : अर्जुन-सानियाच्या नात्यावर अखेर शिक्कामोर्तब; सचिन तेंडुलकरची जाहीर प्रतिक्रिया, 'आम्ही...')

Photo Credit: Varinder Chawla
सचिन तेंडुलकरने सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले VIDEO
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world