जाहिरात

'...तर ही दुर्घटना टाळता आली असती'; कला संचालनालयाचा मोठा गौप्यस्फोट

कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी NDTV मराठीने त्यांच्याशी बातचीत करताना मोठा खुलासा केला आहे. 

'...तर ही दुर्घटना टाळता आली असती'; कला संचालनालयाचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई:

राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुतळा उभारल्यानंतर शिल्पकाराने भीतीही व्यक्त केली होती. आठ महिन्यांपूर्वी त्याने आपलं मनोगत व्यक्त केलं होतं. मात्र त्याच्या भीतीकडे दुर्लक्ष करण्यात आलं का, असा सवाल उपस्थित होत आहे.  

याबाबत कला संचालनालयाने मोठा गौप्यस्फोट केला आहे. कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी NDTV मराठीने त्यांच्याशी बातचीत करताना मोठा खुलासा केला आहे. 

नक्की वाचा - शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटेंनी तेव्हाच व्यक्त केली होती भीती, पण तरीही दुर्लक्ष?

राजीव मिश्रा यांचे धक्कादायक खुलासे...

  • शिल्पकाराच्या स्ट्रक्चरल इंजिनिअर मदतीला असतो. तलवार ताणताना जी दाखवली आहे, त्यामुळे स्ट्रक्चरल इंजिनिअरने आडाखा बांधताना काही चूक राहिली असावी.  
  • ब्राँझमध्ये कास्टिंग केलं असतं तर त्याला वजन आलं असतं. मात्र त्याने कमी वेळात कास्टिंग केलं. परिणामी वाऱ्यामुळे प्लेट्स जाग्यावर राहिल्या नाहीत. पुतळ्यात वापरल्या जाणाऱ्या धातूचे सर्व अधिकार शिल्पकाराकडे असतो. स्ट्रक्चरल इंजिनियरिंगने नीट काम केलं नसल्याचं दिसून येतं. वाऱ्याचा वेग काऊंट करण्यात आला नाही. कास्टिंग करताना आमची मदत घेतली असती तर हे टाळता आलं असतं. 
  • परवानगी जिल्हाधिकारीच देतात, कोणत्याही पुतळ्यासाठी. सोबतच पीडब्लूडीच्या मुख्य वास्तूशास्त्रज्ञ देत असतो. पट्ट्या जोडणीचे काम नीट झाले नसावे. अशा पुतळ्यासाठी किमान 1 वर्ष कालावधी लागतो. या परिस्थितीबद्दल एसपीजीने माहिती घेणे गरजेचे असते.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com