जाहिरात

Hingoli News : बाबा महाराज आले अन् चक्क पोलिसांची गाडीच चालवली, बासंबा पोलीस पाहतच राहिले, नेमकं काय घडलं?

हिंगोलीच्या बासंबा पोलीस ठाण्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. पोलीस ठाण्यात नवी वाहने दाखल झाल्यानंतर भलताच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

Hingoli News : बाबा महाराज आले अन् चक्क पोलिसांची गाडीच चालवली, बासंबा पोलीस पाहतच राहिले, नेमकं काय घडलं?
Hingoli Basamba Police And Baba Maharaj Video

समाधान कांबळे, प्रतिनिधी 

Hingoli Basamba Police Video Viral : हिंगोलीच्या बासंबा पोलीस ठाण्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. पोलीस ठाण्यात नवी वाहने दाखल झाल्यानंतर भलताच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. पोलिसांच्या शासकीय वाहनांची पूजा चक्क भगवी वस्त्र घातलेल्या बाबा महाराजांकडून करण्यात आली आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे या महाराजांनी पोलिसांच्या गाड्यांची टेस्ट ड्राइव्हही केली. हे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच लोकांनी पोलिसांवर टीकेची झोड उठवली आहे. 

पोलिसांच्या नव्या वाहनांची पूजा चक्क बाबा महाराजांनी केली

मिळालेल्या माहितीनुसार,हिंगोलीच्या बासंबा पोलीस ठाण्यात नवीन वाहने दाखल झाल्यानंतर या वाहनांची पूजा चक्क बाबा महाराजांनी केली.एका विशिष्ट धर्माच्या धार्मिक पद्धतीने नवीन शासकीय  गाडीचं पूजन करण्यात आलं.   वीन वाहन मिळाल्यानंतर या वाहनाची पूजा चक्क एका मठातील महाराजाकडून करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

नक्की वाचा >> आईच्या मृतदेहाजवळ 3 वर्षांचं बाळ अन्..त्या धरणात बोट कशी बुडाली? कॅमेरात कैद झाला घटनेचा संपूर्ण थरार, Video

पोलिसांवर सोशल मीडियावर होतेय टीकेची झोड

शासकीय वाहनांच्या ताफ्यात नवीन गाडी आल्यानंतर या वाहनाचं पूजन पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांनी न करता चक्क महाराजांच्या हस्ते करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.या व्हिडीओत पाहू शकता की, एका मठातील महाराजांच्या हस्ते नवीन गाडीला हार घालून नारळ फोडण्यात आला आणि धार्मिक विधी देखील पार पडला.पोलिसांच्या नव्या गाडयांची पूजा बाबा महाराजांकडून केल्यानं हिंगोली बासंबा पोलीस ठाण्याचे अधिकारी अडचणीत सापडले आहेत. 

नक्की वाचा >> Mumbai-Pune Missing Link: महाराष्ट्रदिनी मिसिंग लिंकचं उद्घाटन, कोणत्या वाहनांना मिळणार प्रवेश? टोल लागणार का?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com