जाहिरात
4 months ago
बदलापूर:

बदलापुरातील (Badlapur Child abuse) नामांकित शाळेत दोन चिमुकल्यावर लैंगिक शोषण प्रकरणात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. बदलापुरकरांनी आज मोठं आंदोलन पुकारलं आहे. सकाळपासून येथील रेल्वे, रस्ते आणि रिक्षा बंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि शिक्षक मंत्र्यांनी ग्वाही देऊनही नागरिकांचं आंदोलन सुरूच आहे.  

बदलापुरात पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज

बदलापुरात पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज
पोलिसांच्या लाठिचार्जनंतर आंदोलकांची दगडफेक

बदलापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन करा, गृहमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना आदेश

गिरीश महाजन यांच्या विनंतीनंतरही आंदोलन सुरूच

गिरीश महाजन यांच्या विनंतीनंतरही आंदोलन सुरूच आहे. आंदोलक आणि गिरीश महाजन यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली आहे. आंदोलकांची आरोपीला फाशी देण्याची मागणी कायम आहे. 

आंदोलक हटत नसल्यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकात पुन्हा एकदा लाठीचार्जची तयारी

आंदोलक हटत नसल्यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकात पुन्हा एकदा लाठीचार्जची तयारी

पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून संपूर्ण रेल्वे स्टेशनचा ताबा घेण्यास केली सुरुवात

आंदोलक मात्र अजूनही रेल्वे रुळातच असून आंदोलन मागे न घेण्यावर ठाम

बदलापुरातील घटनेवर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया...

आरोपीला फाशी द्या, अन्यथा आमच्या ताब्यात द्या; आंदोलक भूमिकेवर ठाम..पोलीस हतबल!

आरोपीला फाशी द्या, अन्यथा आमच्या ताब्यात द्या; आंदोलक भूमिकेवर ठाम..पोलीस हतबल!

मॉब कसा आला यावर कमेंट करणे योग्य नाही - देवेंद्र फडणवीस

मॉब कसा आला यावर कमेंट करणे योग्य नाही. जी मागणी होत आहे की तत्काळ फाशी द्या! त्यावर कायद्यानुसार जे तातडीने करता येईल ते करण्याचा सरकारच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. घटना उघडकीस आल्यानंतर कारवाई तत्काळ झाली. मात्र काही दिरंगाई झालीय का याबाबतची चौकशी SIT करेल. कोणत्याही पद्धतीने दिरंगाई केली असेल, जाणीवपूर्वक एफआयआर दाखल करण्यास दिरंगाई झाली असेल तर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. गंभीर घटनांमध्येही काहीजण राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. संवेदनाहीन, संवेदना बोथट झाल्यात असा विरोधी पक्ष आहे, असे मला वाटते.

बदलापूर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया...

देवेंद्र फडणवीस - 

बदलापुरातील अतिशय दुर्देवी घटना आहे. शाळेतील दोन चिमुरडींवर तेथील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केला. याचा उद्रेक पाहायला मिळत आहे. आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्याअंतर्गत एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. याअंतर्गत तत्काळ चार्टशीट दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तत्काळ शिक्षा व्हावी यासाठी पोलीस आणि राज्य सरकारचा प्रयत्न आहे. 

तत्काळ फाशी द्या या मागणीवर फडणवीस म्हणाले, कायद्यानुसार तातडीने जे करता येईल ते केलं जात आहे. दंगा होऊ नये यासाठी प्रयत्न आहे. या प्रकरणात काही दिरंगाई केली गेली आहे का याची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल. आणि अशांवर कडक कारवाई करण्यात येईल. 

विरोधी पक्ष गंभीर घटनांमध्ये राजकीय पोळी भाजतात. त्यांनी राजकीय न वागता न्याय मिळवून कसं देता येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत.

बदलापुरातील त्या घटनेचा फास्ट ट्रॅकचा खटला उज्ज्वल निकम चालवणार?

बदलापुरातील चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालविण्यात येणार आहे. यावेळी उज्जव निकम बाजू मांडणार असल्याचं बदलापुरचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं. 

बदलापूर प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होणं आवश्यक : नीलम गोऱ्हे

बदलापूर प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होणं आवश्यक : नीलम गोऱ्हे 

 

बदलापूर येथे घडलेल्या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या घटनेतील पालकांना दिलासा देणार असल्याचं सांगितलं आहे. अशा प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा देखील घेणार आहे आणि काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याबाबत सूचना देखील करणार असल्याचे सांगितला आहे.

निबंध घेऊन सोडून देणार आहात का? राजकारण न करता लवकरात लवकर कारवाई करा - उद्धव ठाकरे

ही शाळा भाजपच्या लोकांशी संबंधित होती असे मला कळाले आहे. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता यात असला तरी त्यावर विनाविलंब कारवाई झाली पाहीजे.  यात जर भाजपचे कार्यकर्ते असले तर निबंध घेऊन सोडून देणार आहात का? राजकारण न करता लवकरात लवकर कारवाई झाली पाहीजे. - उद्धव ठाकरे , पक्षप्रमुख, शिवसेना (उबाठा)

बदलापुरातील ती शाळा भाजप लोकांशी संबंधित - उद्धव ठाकरे

बदलापुरातील चिमुरडीवर ज्या शाळेत अत्याचार झाला ती शाळा भाजपच्या लोकांशी संबंधित असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

राष्ट्रीय बालहक्क आयोगाने बदलापूर प्रकरणाची घेतली दखल

राष्ट्रीय बालहक्क आयोगाने बदलापूर प्रकरणाची दखल घेतली आहे. बालहक्क आयोग एक तपास पथक बदलापूरला पाठवणार आहे. बदलापूरमध्ये बाल अत्याचाराच्या घटनेनंतर जमाव संतप्त झाल्याची घटना घडली.

बदलापुरातील चिमुरडींवरील अत्याचार प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत. - देवेंद्र फडणवीस

बदलापुरातील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणात SIT स्थापन करणार - देवेंद्र फडणवीस

बदलापुरातील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणात SIT स्थापन करणार आहे. आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन करणार असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

Live Update : 8 तासांनंतरही आंदोलन सुरू, बदलापुरातील घटनेचे तीव्र पडसाद

सकाळी सहा वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. अद्यापही आंदोलक हटण्याचं नाव घेत नसल्याचं दिसत आहे. तब्बल 8 तासांनंतरही आंदोलन सुरूच असून बदलापुरातील शाळेत घडलेल्या घटनेचे तीव्र पडसाद पाहायला मिळत आहे. 

लाडक्या लेकींवर अत्याचार होत असताना आरोपींवर कारवाई करायला तुम्हाला वेळ नाही ? - विजय वडेट्टीवार

हे प्रकरण दाबण्यामागे कोण आहे याची चौकशी होण्याचे गरज आहे.  मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही घटना घडली. एकीकडे लाडकी बहीण योजनेसाठी जाहिराती करायला आणि भाषणे करायला तुम्हाला वेळ आहे मात्र लाडक्या लेकींवर अत्याचार होत असताना आरोपींवर कारवाई करायला तुम्हाला वेळ नाही ?  - विजय वडेट्टीवार

तीन महिन्यात फास्ट ट्रॅकमध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

या प्रकरणी पालकांना बसवून ठेवलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन करावे, या प्रकरणी पीडित मुलींच्या पालकांची तक्रार न घेता त्यांना अकरा तास पोलिस स्थानकात बसवून ठेवले, त्यामुळे कारवाई करण्याची मागणी हे प्रकरण तीन महिन्यात फास्ट ट्रॅकमध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी -  विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

'गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा', सुषमा अंधारेंची मागणी

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. गेल्या काही वर्षात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 

'नराधमाला फाशी द्या', आंदोलक भूमिकेवर ठाम

बदलापुरातील आंदोलनांला लागलं हिंसक वळण.. जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचं जाहीर करण्यात येणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची आंदोलनकर्त्यांची भूमिका कायम आहे...

बदलापुरातील आंदोलन पेटलं; जमावाकडून दगडफेक

बदलापुरातील आंदोलन पेटलं; जमावाकडून दगडफेक

बदलापुरात अज्ञातांकडून दगडफेक, आंदलोकांचा संताप...

बदलापुरात अज्ञातांकडून दगडफेक, आंदोलकांचा संताप...

बदलापूर चिमुरडींवर अत्याचार प्रकरणात शालेय शिक्षण मंत्र्यांचे आदेश...

बदलापूर चिमुरडींवर अत्याचार प्रकरणात शालेय शिक्षण मंत्र्यांचे आदेश...

प्रत्येक शाळांमध्ये सखी-सावित्री समिती स्थापन करणार...

प्रत्येक शाळेत तक्रार बॉक्स हवा यासाठी नवा जीआर काढणार..हा बॉक्स प्रत्येक शाळेत अनिवार्य आहे...

प्रत्येक शाळांमध्ये विशाखा समिती अनिवार्य.. दहावी-नववीतील मुलींची विशाखा समिती स्थापन करणार... 

ज्या शाळेत ही घटना घडली त्या  शाळेला नोटीस बजावली.

शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका यांचं निलंबन..