अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याआधी बारामतीच्या प्रशासकीय भवन परिसरात लागलेल्या एका बॅनरने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर थेट निशाणा साधण्यात आला आहे.
बॅनरवर काय आहे?
अज्ञातांकडून लावण्यात आलेल्या या बॅनरवर लिहिण्यात आले आहे की, "अजित दादांचे फक्त नावच पुरेसे आहे, घातकी तटकरे-पटेलची गरज नाही... समस्त दादा प्रेमी!"
या बॅनरच्या माध्यमातून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा उल्लेख 'घातकी' असा करण्यात आला असून, अजितदादांच्या समर्थकांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी असल्याचे संकेत मिळत आहेत.

(नक्की वाचा- Vasai News: 15 दिवसांत 6 मृतदेह; विरारमध्ये आणखी एक मृतदेह आढळल्याने खळबळ)
उमेदवारी अर्जापूर्वीच अंतर्गत वाद चव्हाट्यावर
सुनेत्रा पवार आज शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार असतानाच अशा प्रकारचे बॅनर लागणे, हे राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. अजितदादांच्या मूळ समर्थकांमध्ये बाहेरील किंवा इतर नेत्यांच्या हस्तक्षेपावरून नाराजी असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. या पोटनिवडणुकीत महायुती एकसंघ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत असतानाच, या बॅनरमुळे विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे.
(नक्की वाचा- Nagpur News: "नोकरीच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावलं अन्...", नागपूरमधील धक्कादायक प्रकार)
कोणाचे कारस्थान?
हे बॅनर खरोखरच अजित दादांच्या समर्थकांनी लावले आहेत की विरोधकांनी महायुतीत फूट पाडण्यासाठी हा डाव आखला आहे, असा देखील प्रश्न आहे. मात्र, या बॅनरमुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world