देवा राखुंडे, प्रतिनिधी
Baramati News : बारामतीतील 'कृषिक' या कृषी प्रदर्शनामध्ये सध्या एका कांद्याची मोठी चर्चा सुरू आहे. हा कांदा साधासुधा नाही तर तब्बल एक किलोचा आहे. एक किलोचा एक कांदा असा विचारही आपण करू शकत नाही. एक किलोचे किमान १० लहान-मोठे कांदे भरतात. मात्र बारामतीच्या मातीत एक किलोच्या एका कांद्याचं उत्पादन घेण्यात आलं आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर कांद्याची लागवड
कृषी प्रदर्शनामध्ये एक किलोचा कांदा पाहायला मिळत असून नेदरलँडचा कांदा बारामतीच्या मातीत रुजला गेलाय. या कांद्याचा रंग काळा राहणार असून याची साठवण क्षमता सात ते आठ महिने असेल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर ही कांद्याची लागवड करण्यात आली असून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा हा ह्याचा मुख्य उद्देश आहे.
आकर्षक लाल रंगाचा हा कांदा जवळपास 500 ते 800 ग्रॅम ते तब्बल एक किलो वजनापर्यंत याची वाढ होत असल्याने या कांद्याच्या एका किलोच्या बियामध्ये एका एकरात देखील लागवड होत असल्याने शेतकरी हा कांदा पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
