मागील 5 वर्षात 834 बेस्ट बस अपघातात 88 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. यात मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमी नागरिकांना 42.40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई दिली गेली आहे. तर 14 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे आणि 24 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, अशीही माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती मागवली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बेस्ट प्रशासनाकडे मागील 5 वर्षात घडलेल्या अपघातांची, जीवितहानी आणि आर्थिक नुकसानभरपाईची माहिती विचारली होती. बेस्टचे वरिष्ठ वाहतुक अधिकारी ईगाल बेंजामिन यांनी अनिल गलगली यांना मागील 5 वर्षांची सविस्तर माहिती दिली आहे.
(नक्की वाचा- Exclusive : "दाक्षिणात्य कर्मचाऱ्यांना प्राध्यान्य", Infosys कंपनीवर गंभीर आरोप करत IT इंजिनिअरचा राजीनामा)
मागील 5 वर्षात 834 बेस्ट बस अपघात झाले असून यात बेस्ट आणि खाजगी कंत्राटदार यांचा समावेश आहे. बेस्टचे 352 अपघात असून यात जीवितहानीची संख्या 51 आहे तर खाजगी कंत्राटदारांकडून करण्यात आलेल्या 482 अपघातात 37 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ष 2022-23 आणि वर्ष 2023-24 मध्ये सर्वाधिक प्रत्येकी 21 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मागील 5 वर्षांत मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना 42.40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई देण्यात आली आहे. यात सर्वाधिक रक्कम ही वर्ष 2022-23 या वर्षात देण्यात आली. त्यावर्षी 107 प्रकरणात सर्वाधिक आर्थिक नुकसान भरपाईची रक्कम 12.40 कोटी रुपये इतकी आहे. 2019-20 मध्ये ही रक्कम 9.55 कोटी, 2020-21 मध्ये ही रक्कम 3.44 कोटी, 2021-22 मध्ये 9.45 कोटी, 2023-24 मध्ये ही रक्कम 7.54 कोटी आर्थिक नुकसानभरपाईची रक्कम आहे.
(नक्की वाचा- Exclusive Interviews : बीडमधील वाढत्या गुन्हेगारीचा पुण्याlतील विद्यार्थ्यांना मनस्थाप; तरुणांनी रडून सांगितले अनुभव)
मागील 5 वर्षांत 12 कर्मचार्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. वैयक्तिक इजा प्रकरणात 2 कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. वैयक्तिक इजा प्रकरणात 24 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अन्य कारवाईत ताकीद, समज, सक्त ताकीद, वसुली अशी कारवाई करण्यात आली आहे. यावरून प्रशासन आणि कर्मचाऱ्यांकडून अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता स्पष्ट होते, असे अनिल गलगली यांचे म्हणणे आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world