
विशाल पाटील, मुंबई
Mumbai News : बेस्ट आठवडाभरापूर्वीच आपल्या भाड्यात दुपटीने वाढ केली आहे. बेस्ट बसच्या भाडेवाढीमुळे महसुलात वाढ झाली आहे. मात्र प्रवाशांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. भाडेवाढीपूर्वी म्हणजेच 8 मेच्या आधी प्रवाशी संख्या 31 लाख होती. यातून दररोज 1 कोटी 75 लाख महसूल बेस्टच्या तिजोरीच जमा होत होता.
भाडेवाढीनंतर 9 मे पासून 21 लाख 17 हजार प्रवाशांनी बेस्टमधून प्रवास केला. भाडेवाढीमुळे बेस्ट बसचे उत्पन्न वाढले मात्र प्रवाशांची शंख्या घडली आहे.
(नक्की वाचा- BMC Election : नवं राजकीय समीकरण? मनसे-शिवसेना युतीबाबत हालचालींना वेग, पडद्यामागे काय घडतंय? )
भाडेवाढ नंतर बेस्ट बसची स्थिती
9 मे
प्रवासी - 23 लाख 17 हजार
महसूल - 2 कोटी 93 लाख 41 हजार
10 मे
प्रवासी - 19 लाख 58 हजार
महसूल - 2 कोटी 56 लाख 64 हजार
11 मे
प्रवासी - 14 लाख 81 हजार
महसूल - 1 कोटी 98 लाख 16 हजार
12 मे
प्रवासी - 19 लाख 82 हजार
महसूल - 2 कोटी 68 लाख 28 हजार
13 मे
प्रवासी - 21 लाख 54 हजार
महसूल - 2 कोटी 83 लाख 20 हजार
(नक्की वाचा : पुणेकरांनो वाहतुकीचे नियम पाळा! गेल्या 120 दिवसात 3 लाखांहून अधिक वाहन चालकांवर कारवाई)
नॉन एसी बसची भाडेवाढ
5 किमी अंतरासाठी भाडे 10 रुपये (आधीचे भाडे 5 रुपये)
10 किमी अंतरासाठी भाडे 15 रुपये (आधीचे भाडे 10 रुपये)
15 किमी अंतरासाठी भाडे 20 रुपये (आधीचे भाडे 15 रुपये)
20 किमी अंतरासाठी भाडे 30 रुपये (आधीचे भाडे 20 रुपये)
एसी बसची भाडेवाढ
5 किमी अंतरासाठी भाडे 12 रुपये (आधीचे भाडे 6 रुपये)
10 किमी अंतरासाठी भाडे 20 रुपये (आधीचे भाडे 13 रुपये)
15 किमी अंतरासाठी भाडे 30 रुपये (आधीचे भाडे 19 रुपये)
20 किमी अंतरासाठी भाडे 35 रुपये (आधीचे भाडे 25 रुपये )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world