Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास आता महागणार आहे. कारण लोकस ट्रेननंतर मुंबईतील प्रवासाचा प्रमुख माध्यम बेस्ट बस आहे. या बेस्ट बसच्या भाड्यात वाढ होणार आहे. मुंबई महानगरपालिकेने बेस्ट बस भाडेवाढीला मंजुरी दिली आहे.
यातून महापालिकेला वार्षिक 590 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या नॉन-एसी बसमध्ये प्रवास करण्यासाठी किमान भाडे 5 रुपये आणि कमाल 20 रुपये आहे. तर एसी बसचे भाडे 6 रुपये ते 25 रुपये आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बेस्ट बसच्या भाड्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार साध्या बससाठी 5 रुपयांऐवजी 10 रुपये तर एसी बससाठी 6 रुपयांऐवजी 12 रुपये भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.
बेस्टने 2019 मध्ये प्रवासी संख्या वाढवण्यासाठी बस भाडे कमी केले होते. 20 किमी नंतर जास्तीत जास्त भाडे नॉन-एसी बसेससाठी 20 रुपये आणि एसी बसेससाठी 25 रुपये असे मर्यादित केले होते. आता कमाल अंतर स्लॅब 25 किमी पर्यंत सुधारित केला जाईल.
(नक्की वाचा - MHADA : म्हाडाच्या घरांच्या किमतीचा वाद उच्च न्यायालयात, ग्राहकांची मोठी मागणी; काय आहे प्रकरण?)
नॉन एसी बससाठी प्रस्तावित भाडेवाढ
- 5 किमी अंतरासाठी प्रस्तावित भाडे 10 रुपये (आधीचे भाडे 5 रुपये)
- 10 किमी अंतरासाठी प्रस्तावित भाडे 15 रुपये (आधीचे भाडे 10 रुपये)
- 15 किमी अंतरासाठी प्रस्तावित भाडे 20 रुपये (आधीचे भाडे 15 रुपये)
- 20 किमी अंतरासाठी प्रस्तावित भाडे 30 रुपये (आधीचे भाडे 20 रुपये)
एसी बससाठी प्रस्तावित भाडेवाढ
- 5 किमी अंतरासाठी प्रस्तावित भाडे 12 रुपये (आधीचे भाडे 6 रुपये)
- 10 किमी अंतरासाठी प्रस्तावित भाडे 20 रुपये (आधीचे भाडे 13 रुपये)
- 15 किमी अंतरासाठी प्रस्तावित भाडे 30 रुपये (आधीचे भाडे 19 रुपये)
- 20 किमी अंतरासाठी प्रस्तावित भाडे 35 रुपये (आधीचे भाडे 25 रुपये)
(नक्की वाचा- Bhandara Accident: जेवणासाठी टर्न घेतला अन् घात झाला, 4 जणांचा जागीच जीव गेला, भंडाऱ्यात हळहळ)
एसव्हीआर श्रीनिवास यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये बेस्ट महाव्यवस्थापक म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्यानंतर भाडेवाढीचा प्रस्ताव मांडला होता. या निर्णयामुळे बेस्टला 590 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
बेस्ट बसमधून दररोज 31 लाख प्रवाशी प्रवास करतात. बेस्टच्या ताफ्यात सध्या 2186 बसेस आहेत, त्यापैकी 847 बसेस बेस्टच्या मालकीच्या आहेत. सध्या तिकीट विक्रीतून दरवर्षी सुमारे 856 कोटी रुपये मिळतात. भाडेवाढीमुळे वार्षिक महसूल अंदाजे 1400 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.