भोकरदन जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटात अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. भोकरदन येथील सभेदरम्यान ही गटबाजी उफाळून आली. काल जयंत पाटील, अमोल कोल्हे हे शिवस्वराज्य यात्रा घेऊन शहरात दाखल झाले. त्यानंतर या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रेच्या सभेवेळी डॉ. अमोल कोल्हे यांचं भाषण संपल्यानंतर राजेश टोपे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा लहाने यांच्या गटाकडून काही काही कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर घेऊन राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
सुरेखा लहाने यांना भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी करत गोंधळ घालायला सुरुवात केला. यावेळी राजेश टोपे, चंद्रकांत दानवे यांच्याकडून शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत असताना राजेश टोपे यांनी भाषण बंद करून घोषणा आणि पोस्टरबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आव्हान केले.
दरम्यान कार्यकर्ते गोधळ घालत असल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना झापत रावसाहेब दानवे यांना मदत करणं सुरू केलंय का? असा सवाल उपस्थित केला. दरम्यान तुम्ही जर असाच गोंधळ घालत राहिलात तर मला बोलायची इच्छा नसल्याचं सांगत जयंत पाटील यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यास नकार दिला, दरम्यान चंद्रकात दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांना बोलण्याची विनंती ही केली, मात्र संतापलेल्या जयंत पाटील यांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला.
नक्की वाचा - शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळेंविरोधात घातपात? गीता खरेंसह पाच जणांवर गुन्हा दाखल
यामुळे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघ चंद्रकांत दानवे विरुद्ध सुरेखा लहाने असे दोन गट पडल्याने हे प्रकरण चव्हाट्यावर आलं आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच हे दोन गट विधानसभा मतदार संघात आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून आमने सामने आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world