मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (State Cabinet meeting) मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी (Toll exemption) करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे. ऐरोली, वाशी, दहिसर, मुलुंड-एलबीएस, आनंदनगर येथील मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोलमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारकडून मोठे निर्णय घेतले जातील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यात मुख्यमंत्र्यांनी या अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दररोज साधारण सहा लाख वाहनं मुंबईत ये-जा करीत असतात. मुख्यमंत्री यांच्या मंत्रिमंडळातील निर्णयामुळे लाखो वाहन चालकांना फायदा होणार आहे.
नक्की वाचा - Live Update : कौशल्य विकास विद्यापीठाला रतन टाटा यांचे नाव
जड वाहनं सोडून इतर हलक्या वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. यापूर्वीही हलक्या वाहनांना टोलमाफी मिळावी अशी मागणी केली जात होती. अखेर विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी राज्य सरकारकडून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणत्या पाच टोलनाक्यांवर टोलमाफी...
- ऐरोली
- वाशी
- दहिसर
- मुलुंड-एलबीएस
- आनंदनगर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world