Mumbai News: मुंबई भाजपामध्ये मोठे फेरबदल होणार; मात्र आमदारांना प्रमुख पदांवर संधी नाही?

सध्या मुंबई भाजपचे अध्यक्षपद आशिष शेलार यांच्याकडे आहे. मात्र, आगामी काळात नवीन अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News: मुंबई भाजपामध्ये लवकरच मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. आगामी काळात मुंबई भाजपची नवीन कार्यकारिणी तयार केली जात असून, त्यात आता आमदारांना सरचिटणीस आणि महामंत्री यांसारखी महत्त्वाची पदे दिली जाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या बदलांनुसार, सामान्य कार्यकर्त्यांना संघटनेत अधिक संधी दिली जाईल, असे सांगितले जात आहे.

आशिष शेलारांच्या जागी नवीन अध्यक्ष?

सध्या मुंबई भाजपचे अध्यक्षपद आशिष शेलार यांच्याकडे आहे. मात्र, आगामी काळात नवीन अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई अध्यक्षपदासाठी आमदार प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.

(नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप)

भाजपच्या या संभाव्य बदलांमागे संघटनेला अधिक लोकाभिमुख बनवण्याचा आणि सामान्य कार्यकर्त्यांना संघटनेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे. आमदारांना त्यांच्या मतदारसंघात लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळावी, तसेच संघटनेतील पदांसाठी नवीन आणि उत्साही नेतृत्वाला वाव मिळावा, हा यामागचा एक महत्त्वाचा विचार असू शकतो.

(नक्की वाचा - Bhaskar Jadhav: 'बामदास छमछम'! भास्कर जाधवांनी रामदास कदमांना दिलं नवं नाव, केला मोठा गौप्यस्फोट)

येत्या काही दिवसांत मुंबई भाजपच्या नेतृत्वात आणि कार्यकारिणीत या संदर्भात मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. या बदलांमुळे मुंबईच्या राजकारणावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Advertisement

Topics mentioned in this article