जाहिरात

Business Hub : BKC पेक्षाही भव्य बिझनेस हब उभारणार; ठाणे-नवी मुंबई-कल्याणच्या वेशीवर मेगा प्लानची तयारी

ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली, पनवेल मार्गाच्या वेशीवर बिझनेस हब सुरू करणार असल्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचेल.

Business Hub : BKC पेक्षाही भव्य बिझनेस हब उभारणार; ठाणे-नवी मुंबई-कल्याणच्या वेशीवर मेगा प्लानची तयारी

Business Hub : बीकेसीपेक्षाही भव्य बिझनेस हब उभारण्याची तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे ठाणे-नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह पनवेल महापालिकेच्या वेशीवर हे नवं बिझनेस हब उभारण्याचा प्लान केला जात आहे. यासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्थी अर्थात जायका मार्गदर्शन करणार आहे. यामुळे चारही शहरांच्या विकासाला गती मिळेल. 

बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकाभोवती १३०० एकर जागेवर हे नवे हब विकसित करण्यात येणार आहे. हे बिझनेस हब सध्याच्या बीकेसीपेक्षाही अत्याधुनिक असणार आहे. या नव्या हबसाठी ठाणे महापालिका नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार आहे. 

नक्की वाचा  - Mumbai Metro: मुंबई मेट्रो प्रशासनाने दिव्यांग प्रवाशांसाठी घेतला मोठा निर्णय! मासिक पासमध्ये दिली 'इतकी' सवलत

भूसंपादनासाठी जाहिरात प्रसिद्ध...

जायकाने बिझनेस हबच्या भूसंपादनासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ठामपा आणि केडीएमसी हद्दीतील दातिवली, म्हातार्डी, बेतवडे, आगासन, आयरे, कोपर, भोपर, नांदिवली, पंचानंद, काटई यासारख्या गावांच्या जमिनी संपादित करण्यात येणार आहे. लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

उद्योग वाढ...

नवे बिझनेस हब सुरू केल्यामुळे नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. याशिवाय ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली, पनवेल मार्गाच्या वेशीवर बिझनेस हब सुरू करणार असल्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचेल. सद्यस्थितीत उपनगरातून बीकेसीला नोकरीसाठी येणाऱ्यांना दीड ते दोन तासांचा अवधी लागतो. याशिवाय येथे वाहतूक कोंडीलाही तोंड द्यावं लागतं. मात्र ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली, पनवेल यांना जोडणाऱ्या ठिकाणी बिझनेस हब सुरू करणार असल्यामुळे नागरिकांना वेळ वाचेल. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com