जाहिरात

BJP News: 1 ते 25 डिसेंबरदरम्यान देशभरात 'सेवा दूत अभियान', भाजपच्या मराठवाडा कार्यशाळेतील मोठे निर्णय!

भाजपच्या या देशव्यापी अभियानाचे सूक्ष्म नियोजन, कार्यपद्धती आणि अंमलबजावणी यावर छत्रपती संभाजीनगरमधील कार्यशाळेत सखोल चर्चा झाली. अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश रवींद्र चव्हाण यांनी दिले.

BJP News: 1 ते 25 डिसेंबरदरम्यान देशभरात 'सेवा दूत अभियान', भाजपच्या मराठवाडा कार्यशाळेतील मोठे निर्णय!

भारतीय जनता पार्टीच्या वतीने येत्या 1 ते 25 डिसेंबर 2026 या कालावधीत देशभरात 'सेवा दूत अभियान' राबवले जाणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि पूर्वतयारीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

१ ते २५ डिसेंबर २०२६ दरम्यान 'सेवा दूत अभियान' 

भाजपच्या या देशव्यापी अभियानाचे सूक्ष्म नियोजन, कार्यपद्धती आणि अंमलबजावणी यावर छत्रपती संभाजीनगरमधील कार्यशाळेत सखोल चर्चा झाली. अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश रवींद्र चव्हाण यांनी दिले.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, “समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेणे, त्यांना आवश्यक ते सहकार्य करणे आणि सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे, हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी परस्पर समन्वयाने काम करावे.

प्रमुख नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या विभागीय कार्यशाळेस भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी, खासदार डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार संजय केनेकर यांच्यासह मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
BJP
Listen to the latest songs, only on JioSaavn.com