जाहिरात

Vidhan Parishad Election: पुणे विभागात जोरदार शक्तिप्रदर्शन; युतीच्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दोन दिवसांचा महत्त्वपूर्ण पुणे विभागीय दौरा केला. या दौऱ्यात पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला.

Vidhan Parishad Election: पुणे विभागात जोरदार शक्तिप्रदर्शन; युतीच्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ

Pune News : पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांनी दोन दिवसांचा व्यापक पुणे विभागीय दौरा केला. या दौऱ्यादरम्यान पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांच्या भाजप कोअर कमिटीच्या संघटनात्मक आढावा बैठका पार पडल्या.

पुण्यातील भव्य कार्यकर्ता संमेलनातून पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ करण्यात आला.

जुनी पेन्शन समन्वय संघाचा पाठिंबा

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेबाबत निवेदन सादर केले. या भेटीदरम्यान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना सुरू ठेवण्याबाबत निवेदन सादर केले. यावेळी संघाने पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील भाजप-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला.

अपक्ष उमेदवाराचे समर्थन

कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांच्या बैठकांदरम्यान अपक्ष उमेदवार नंदकुमार सागर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत थेट भाजप-महायुतीला समर्थन जाहीर केले. याशिवाय मतदार नोंदणी मोहीम तीव्र करणे, बूथनिहाय सूक्ष्म नियोजन आणि प्रचार यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबवणे याबाबत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.

रविंद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

या वेळी मार्गदर्शन करताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, “युवा वर्गाला शिक्षण, करिअर आणि स्टार्टअपच्या माध्यमातून उन्नतीच्या संधी मिळाव्यात, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप-महायुती सरकार सदैव कटिबद्ध आहे. या कार्याला आणखी गती देण्यासाठी उच्चशिक्षित आणि शिक्षक-पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेले उमेदवार देण्यात आले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढील काही दिवस संपूर्ण ताकदीनिशी काम करावे.”
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
BJP
Listen to the latest songs, only on JioSaavn.com