Political News : महायुतीत दोस्तीत कुस्ती! 2029 विधानसभेसाठी आतापासूनच उमेदवारांची जुळवाजुळव?

भाजपकडून या सुरू झालेल्या मोहिमेला शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील त्याचप्रकारे उत्तर देण्यात येत आहे आणि शिवसेनेकडून देखील भाजपच्या आमदारांच्या विरोधात पराभूत झालेल्या उमेदवारांना शिवसेनेत घेण्यात येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Political news : भाजपने 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी केली आहे. भाजपकडून 2029 च्या विधानसभेच्या निवडणुकीकरता शत प्रतिशत भाजप नारा दिलाय. तर महायुती मित्र पक्षांनी देखील भाजपाला आतापासूनच आव्हान देण्यास केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. 

2024 च्या विधानसभेच्या निवडणुका संपताच विधानसभेतील पराभूत उमेदवारांना भाजपकडून संपर्क साधण्यात आला आहे. त्यांचे पक्षप्रवेश सुरू आहेत त्याचवेळी मित्र पक्ष असलेले शिवसेना आणि एनसीपी यांनाही भाजपा प्रतिस्पर्धी ताकद देण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे भविष्यात महायुतीतच टोकाची स्पर्धा डोकेदुखी ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement

(नक्की वाचा- चांदीवलीतील MMRDAच्या पीएपी इमारतींबाबत मोठा निर्णय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश)

भाजपच्या शत-प्रतिशतचा धसका

शत-प्रतिशत भाजपचा धसका महायुतीमधील मित्रपक्षांनी सुद्धा घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून माजी आमदारांना आणि विधानसभेत पराभूत झालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांना पक्षात घेण्याच्या संदर्भात हालचाली वाढू लागल्या आहेत.

Advertisement

माजी आमदार संग्राम थोपटे, सत्यजीत पाटणकर, वैभव पाटील, प्रीतम म्हात्रे, माजी आमदार प्रकाश पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, क्रिकेटपटू केदार जाधव, शेकापचे पंडीत पाटील आणि आस्वाद पाटील या नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश अलीकडेच झाला आहे

Advertisement

भाजपकडून या सुरू झालेल्या मोहिमेला शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील त्याचप्रकारे उत्तर देण्यात येत आहे आणि शिवसेनेकडून देखील भाजपच्या आमदारांच्या विरोधात पराभूत झालेल्या उमेदवारांना शिवसेनेत घेण्यात येत आहे. माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, हेमलता पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार भाऊसाहेब चिटगावकर, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, प्रीती बंड, निलेश सांबरे या सर्व नेत्यांची पक्षप्रवेश आतापर्यंत शिवसेनेत झाला आहे.

(नक्की वाचा-  ठाकरे गटाची BMC निवडणुकीसाठी तयारी, 12 उपनेत्यांवर विशेष जबाबदारी)

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष देखील महायुतीमध्ये पक्षप्रवेशाच्या संदर्भात मागे राहिलेला नाही. त्यांनी देखील त्यांच्या पक्षात विधानसभेच्या निवडणुकीनंतर मोठी इनकमिंग सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात देखील अलीकडे माजी आमदार केपी पाटील, माजी आमदार सुरेशकुमार जेठलिया, माजी आमदार मोहन हंबरडे, माजी खासदार डी एस अहिरे, रमेश अडसकर, तमनगौडा पाटील, माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, उदयसिंह पाटील उंडाळकर, माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार प्रकाश पोकर्ण, माजी आमदार राहुल जगताप या नेत्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. हे सर्व पक्षप्रवेश बघता महायुतीमधील तिन्ही पक्षात किती अविश्वास वाढणार का अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

Topics mentioned in this article