BMC Election : ठाकरे बंधू एकत्र आल्यास काय चित्र असेल? महापालिका निवडणुकीसाठी भाजपचं अंतर्गत सर्वेक्षण?

BMC Election News : दोन ठाकरे बंधू एकत्र आले, तरी तुर्तास  भाजपच्या जागांवर फारसा परिणाम होणार नाही, असं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. उद्धव ठाकरे गटातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत पूर्णपणे सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. तर मनसेकडून नेत्यांच्या समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मात्र ठाकरे गट आणि मनसेची युती झाल्यात महायुतीला याचा फटका बसेल का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याचं उत्तर शोधण्यासाठी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने अंतर्गत  सर्वेक्षण केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुंबईत भाजपकडून अंतर्गत पहिले सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे.  राज  ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मुंबईत काय चित्र असेल? याचाही आढावा यात घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. 

(नक्की वाचा-  आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा! अजित पवारांचा आमदार बंडाच्या तयारीत)

दोन ठाकरे बंधू एकत्र आले, तरी तुर्तास  भाजपच्या जागांवर फारसा परिणाम होणार नाही, असं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. मनसे ठाकरे गट एकत्रिकरणाचा फटका शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या मतदारांवर अधिक होत असल्याचे सर्वेक्षणात समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  

भाजपने मुंबईत जास्तीत जास्त महापालिका जागा लढल्यास भाजपला फायदा होत असल्याचे सर्व्हेतील निरीक्षण आहे. भाजपने स्वबळावर निवडणूक लढल्यास अधिक फायदा होत असल्याचे सर्वेक्षणात दिसून आल्याचे समजते आहे. 
 

Advertisement

Topics mentioned in this article