राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. वांद्र्यातील खेरवाडी परिसरातील त्यांच्या ऑफिस बाहेर ही घटना घडली आहे. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्याची माहिती मिळत आहे. एक गोळी छातीत लागल्याची माहिती मिळत आहे. एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी ऑफिसमधून बाहेर निघाले होते. गाडी बसत असताना बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांना त्यांच्यावर गोळीबार केला. तीन राऊंड त्यांच्यावर फायर झाल्याचं कळतंय. जखमी झालेल्या बाबा सिद्दिकी यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांकडून या प्रकरणी अत्यंत गोपनीयता बाळगली जात आहे. पुनर्विकास वादातून राजकीय पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती पोलिसांकडून मिळालेली नाही.
गोळीबाराच्या घटनेनंतर बाबा सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. लिलावती रुग्णालयाबाहेरही सिद्दिकी यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world