
मृत्यू कुणाला कुठे गाठेल याचा नेम नाही. मुंबई एका चिमुरडीचा अंगावर कुत्रा पडल्याने मृत्यू झाला आहे. मुंब्र्यातील अमृत नगर परिसरातील ही घटना आहे. परिसरातील चिराग नावाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून कुत्रा पडल्याने या 3 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
इमारतीवरुन पडलेला कुत्रा कैद सैय्यद या व्यक्तीचा असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत कुत्रा देखील जखमी झाला आहे. सीसीटीव्हीती दृश्यांनुसार कुत्रा मुलीच्या अंगावर पडल्यानंतर ती बेशुद्ध झाली. जखमी अवस्थेत तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
Mumbra | अंगावर कुत्रा पडल्यामुळे तीन वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू | NDTV मराठी#Mumbra #ndtvmarathi
— NDTV Marathi (@NDTVMarathi) August 7, 2024
फॉलो करा
Twitter - https://t.co/1uwrVtzaXX
Facebook - https://t.co/UvK0fv740c
Instagram - https://t.co/7hr9ZQ3Wvb
Youtube - https://t.co/iTxUKmIVYu pic.twitter.com/ah1YEiSyUs
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world