
Chhatrapati Sambhanjinagar Crime News : तामिळनाडूमधील व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून तब्बल २.२७ कोटी रुपये उकळणाऱ्या दोन इंजिनिअर तरुणांना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे या दोघांना तामिळनाडू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. श्रीकांत सुरेशराव गाडेकर, नरेश कल्याणराव शिंदे असे दोन्ही आरोपींचे नावं आहे. तसेच या दोन्ही आरोपींचा आणखी एक साथीदार असण्याची शक्यता आहे.
तामिळनाडूमधील चेन्नईच्या तिरुवनचेरी परिसरात सेवानिवृत कर्मचारी प्रभाकरन कुंधू चंद्रन रुवी राहतात. दरम्यान आरोपींनी प्रभाकरन यांच्याशी संपर्क साधला. तसेच आपण दिल्ली सायबर पोलिस असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्या कॅनरा बँकेतील खात्यावर मनी लॉड्रिंगद्वारे मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगून प्रभाकरन यांना अटक होण्याची भीती दाखवली. प्रभाकरन यांनी अटकेच्या भीतीने २ कोटी २७ लाख २४ हजार ९०० रुपये दिले.
(नक्की वाचा- Pune News: 'मल्हार' गडावर बेशिस्त पर्यटकांना जागरूक नागरिकाचा दणका, VIDEO पाहून अभिमान वाटेल)
मात्र आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तिरुवनचेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार तामिळनाडू सायबर क्राइम विंगकडून तपास करण्यात येत होता. पण यातील आरोपी छत्रपती संभाजीनगर शहरात असल्याचे पोलिसांच्या तांत्रिक तपासातून समोर आले. त्यामुळे तामिळनाडू पोलीस संभाजीनगरला धडकले आणि आरोपींना बेड्या ठोकल्या.
१५ हून अधिक सिमकार्ड मिळाले
अटक करण्यात आलेल्या श्रीकांत आणि नरेश दोघांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यामुळे डिजिटल अरेस्टसाठी लागणारे ज्ञान त्यांना अवगत होते. गुन्हा करण्यापूर्वी त्यांनी सर्व तांत्रिक गोष्टी जमवल्या होत्या. पोलिसांनी ९ मोबाइल ताब्यात घेतले. ज्यात ३ मोबाइल ते वैयक्तिक कामांसाठी वापरत होते. त्यांच्याकडून १५ हून अधिक सिमकार्ड, ३ बँक खात्यांचे पासबुक जप्त केले. तसेच त्यांची आणखी ३ बँक खाती आहेत.
(नक्की वाचा- Pune News: मुस्लिम माजी सैनिकाच्या कुटुंबावर दहशत माजवण्याचा प्रयत्न, दहशत निर्माण करणारे कोण?)
ग्रामीण पालिसांची मदत
तामिळनाडूत गुन्हा दाखल झाल्यावर तपसाधिकारी बी. के. सशिकुमार, पोलीस निरीक्षक, सायबर काईम विंग, तांबरम शहर, यांनी पथकासह नमुद आरोपीतांना पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांची भेट घेवुन मदत मिळणे बाबत विनंती केली. त्यानुसार पोलीस अधीक्षक राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तामिळनाडू पोलिसांना तपासात मदत करण्याच्या सूचना दिल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world