
प्रथमेश गडकरी
सिडको माझ्या पसंतीचे घर ही योजनेची लॉटरी नुकतीच जाहीर झाली. त्याच बरोबर सिडकोच्या घरांच्या किंमतीही जाहीर झाल्या. या किंमती वरून लॉटरीधारकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सिडकोच्या घरांच्या किंमती या आवाक्या बाहेर असल्याचं मत व्यक्त केले जात आहे. शिवाय खाजगी बिल्डरच्या किंमती प्रमाणे सिडकोने किंमती ठेवल्याचाही आरोप झाला आहे. यातून सिडको कुणाला फायदा पोहचवत आहे असा सवालही केला जात आहे. त्यामुळे किंमती कमी केल्या जाव्यात याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यासाठी मनसेने पुढाकार घेतला आहे. असं असतानाही कोणत्या ही परिस्थित सिडकोने किंमती कमी करणार नाही अशी भूमीका घेतली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सिडकोच्या घरांच्या किंमती कमी व्हाव्या यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी साखळी आंदोलनही नवी मुंबईत केलं गेलं. मात्र त्याचाही काही परिणाम झाला नाही. त्यामुळे मनसेच एक शिष्टमंडळ गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या अध्यक्षांना भेटले. यावेळी लॉटरीधारकांची किंमती कमी व्हाव्यात ही भावना आहे असे काळे यांनी अध्यक्षांना सांगितलं. त्यामुळे किंमती कमी करण्याचा निर्णय सिडकोने घ्यावा अशी विनंती त्यांनी केली. मात्र सिडकोने नव्या घरांमध्ये चांगल्या सुविधा दिल्या आहेत. शिवाय घरांचे बांधकाम ही उच्च दर्जाचे आहेत. त्यामुळे किंमती कमी होणार नाहीत असं स्पष्ट पणे सांगितलं.
ट्रेंडिंग बातमी - Waqf Bill: 'वक्फची जमीन सोडा, चीनने किती जमीन हडप केली सांगा' अखिलेश यादव भडकले
सर्व सामान्यांसाठी घरे असे सिडको सांगते. पण सिडकोच्या घरांच्या किंमती पाहिल्या असत्या त्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत हे स्पष्ट आहे. घराच्या किंमती कमी होणार नाहीत ही सिडकोची भूमीक आहे. त्यामुळे मनसेने अधिक आक्रमक भूमीका घेतली आहे. आता सिडको विरोधात मनसेने 'इंजेक्शन मोर्च्या'ची घोषणा केली आहे. शिवाय या घरांच्या किंमती जर कमी केल्या गेल्या नाहीत तर मनसेच्या माध्यमातून आझाद मैदानात आंदोलन केले जाणार आहे अशी घोषणा ही त्यांनी केली आहे. त्यामुळे घरांच्या किंमती कमी होतील ही आशा निर्माण झाली आहे.
दरम्यान, या संदर्भात मनसे कार्यकर्ते आणि सिडको सोडत धारकांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची शिवतीर्थावर भेट घेतली आहे. शिवाय या आंदोलनाचे नेतृत्व राज ठाकरे यांनी करावे अशी गळ त्यांना घातली आहे. राज ठाकरे यांनीही हा घरांचा प्रश्न आहे. शिवाय तो सर्व सामान्य गरिबांच्या घराचा प्रश्न आहे त्यामुळे त्यात लक्ष घालण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज ठाकरे या विषयी पुढाकार घेणार असल्याचे मनसे आणि लॉटरीधारकांच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे. त्यामुळे सिडकोच्या या प्रकरणात राज ठाकरेंची एन्ट्री होणार हे निश्चित समजले जात आहे. मात्र त्यानंतर तरी किंमती कमी होणार का? हा खरा प्रश्न आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world