
शिवेसना-भाजपची युती कशी तुटली याबाबत दोन्ही बाजूंनी आरोपी-प्रत्यारोत होत असतात. युती तुटण्यासाठी नेमकं कोण कारणीभूत आहे, हे सांगता येणार नाही. मात्र शिवेसना फुटीनंतर हा विषय देखील फार चर्चेत येत नाही. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांनी भाष्य केलं आहे. 2014 सालीच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर यांच्या सत्कार समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा खुलासा केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
2014 च्या जागावाटपाचा संदर्भ देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, त्यावेळी आम्ही शिवसेनेला 147 जागा देण्यास तयार होतो. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजपचा उपमुख्यमंत्री असेल असं देखील ठरले होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी 151 जागा देण्याचा आग्रह धरला आणि युती तुटली.
भाजपने शिवसेनेला 147 जागा आणि स्वतःसाठी 127 जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु उद्धव ठाकरे 151 जागांवरच अडले होते. त्यावेळी ओमप्रकाश माथूर, अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर काय घडलं हे सर्वांनाच माहिती आहे. 2014 ते 2024 पर्यंत महाराष्ट्रातील तिन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये 100 पेक्षा जास्त जागा जिंकणारा भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
(नक्की वाचा- Avhad vs Rane: राजापूर वाद ते हलाल झटका! आव्हाड- राणेंमध्ये उडला विधानसभेत खटका)
"युती तुटू नये यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते"
देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रात आले होते. 2014 सालीच भाजपचे वरिष्ठ युती तोडण्यासाठी आले होते. त्यावेळी एका-एका जागेसाठी 72 तास चर्चा केली होती. युती तुटू नये यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते. देवेंद्र फडणवीस यांना युती तुटू नये असं प्रामाणिकपणे वाटत होतं, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Kunal Kamra:'चेहरे पे दाढी,आखो मे शोले', कुणाल कामराचं सोडा शिंदेंच्या सेनेची कविता एकदा ऐकाच)
शिवसेनेत फूट
भाजपशी संबंध तोडल्यानंतर उद्धव ठाकरेंना त्यांच्या पक्ष गमवावा लागला आहे. शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे आणि या निवडणुकीत चांगली कामगिरी करून एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांचाही पाठिंबा असल्याचे सिद्ध केले आहे. एकेकाळी मुंबईवर राज्य करणारे ठाकरे कुटुंब सध्या सर्वात मोठ्या राजकीय संकटाचा सामना करत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही गोंधळाचे वातावरण आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world