जाहिरात

Devendra Fadnavis on Beed : 'बीडमध्ये कुणाची दादागिरी चालणार नाही', मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावलं!

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

Devendra Fadnavis on Beed : 'बीडमध्ये कुणाची दादागिरी चालणार नाही', मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावलं!
नागपूर:

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडूनही या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही संताप व्यक्त केला आहे. नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या घटना गंभीर असल्याचं सांगत अशा गुन्हेगारांना जरब बसविल्याशिवाय शांत बसणार नाही. बीडमध्ये कुणाची दादागिरी चालणार नाही, असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना ठणकावलं. 

Crime News: आधी 15 लाख मागितले, मग बॉस सोबत शरीरसंबध ठेवायला सांगितले, पुढे मात्र...

नक्की वाचा - Crime News: आधी 15 लाख मागितले, मग बॉस सोबत शरीरसंबध ठेवायला सांगितले, पुढे मात्र...

या पत्रकार परिषदेत त्यांनी बांगलादेशी घुसखोर, महिला अत्याचार, सायबर गुन्ह्यांवर भूमिका मांडली. महिला अत्याचारावर फडणवीस म्हणाले,  95 टक्के घटना या नातेवाईक आणि परिचितांकडून होतात. त्यामुळे सामाजिक जागृतीसाठी प्रयत्न करायला हवेत. मी राजकरणी नाही. मी आपल्या मार्गाने राजकारण करतो. अनुभवाने शहाणे होतो. जो निर्णयच करणार नाही तो चूक करणार नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सायबर गुन्हे हे सर्वात मोठे आव्हान आहे. तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. जे नालायक लोक लुबाडण्याचं काम करतात. यासाठी आम्ही सायबर जागृती करत आहोत. देशातील सर्वात मोठे सायबर प्लॅटफॉर्म महाराष्ट्रात केले. जगातील सर्वोत्तम टूल्स आमच्याकडे. याच्या माध्यमातून वेगवेगळ्या सायबर गुन्ह्यांना उघडकीस आणू शकतो, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

Kalyan Crime News :अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण; मुख्य आरोपीला अटक

नक्की वाचा - Kalyan Crime News :अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण; मुख्य आरोपीला अटक

योजनांचं नियोजन आम्ही करतोय...
आम्ही ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्याचा भार आमच्या अर्थसंकल्पावर पडेल. पण त्याचे ही नियोजन आम्ही करत आहोत. कोणाच्याही मनात शंका राहू नये. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर हफ्ता जमा केला असून तो निधी खात्यात जात आहे.दुसरीकडे शिवराज सिंग चौहान यांनी महाराष्ट्राला एकाच वर्षात 20 लाख घरे प्रधान मंत्री आवास अंतर्गत दिली. कित्येक राज्यांना इतकी घरे दहा वर्षांत देखील मिळालेली नाहीत.