
CM Ladki Bahin Yojna : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार-संलग्नित बँक खात्यात लवकरच हा निधी जमा होणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली.
अदिती तटकरे यांनी ट्विट करत म्हटलं की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे."
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 11, 2025
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली… pic.twitter.com/oRnOcQxuzP
लाडकी बहीण योजनेचे फायदे
‘माझी लाडकी बहीण' योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक मदत करणे आहे. यामुळे महिलांना स्वतःच्या गरजा पूर्ण करता येतात आणि कुटुंबाच्या आर्थिक गरजांमध्येही त्या मदत करू शकतात. योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रक्कम दिली जाते.
पैसे आले की नाही कसं चेक कराल?
ऑनलाईन बँकिंग : ज्या बँकेच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात, त्या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. अथवा तुमच्या मोबाईलमध्ये त्याचे अॅप डाऊनलोड असेल तर तिथे जाऊन चेक करा. त्या ठिकाणी तुम्हाला हे पैसे जमा झाले की नाही हे निश्चित समजेल.
मोबाईल SMS : सध्या बहुतेक ग्राहकांचे मोबाईल क्रमांक हे बँकेच्या खात्याशी जोडलेले असतात. त्या मोबाईल क्रमांकावर तुमच्या खात्यामधील व्यवहाराचे सर्व अपडेट मिळतात. 'लाडकी बहीण योजनेचे' पैसे जमा झाल्यानंतर तुम्हाला बँकेकडून मोबाईलवर एसएमसच्या माध्यमातून चेक करता येईल.
फोन बँकिंग : बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर फोन केल्यानंतरही तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा झाली त्याची माहिती मिळते. या माध्यमातूनही तुम्ही पैसे जमा झाले की नाही याची खात्री करु शकता.
प्रत्यक्ष बँकेत जा : बँकेमध्ये प्रत्यक्ष जाऊन तुम्ही तेथील अधिकाऱ्याशी संपर्क साधून किती रक्कम जमा झाली हे तपासू शकता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world