काँग्रेसने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या चौथ्या यादीत एकूण 14 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसनं चौथ्या यादीत आधीचे दोन उमेदवार बदलले आहेत. यामध्ये अंधेरी पश्चिम येथे सचिन सावंत यांच्या जागी अशोक जाधव यांना संधी दिली आहे. तर औरंगाबाद पूर्वमधून मधूकर देशमुख यांच्या जागी लहू शेवाळे यांना पक्षाने तिकीट दिलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काँग्रेसने चौथ्या यादीत पुण्यात दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. शिवाजीनगर मतदारसंघातून दत्तात्रय बहिरट यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर पुणे छावणी येथून रमेश बागवे यांना तिकीट देण्यात आलं आहे.
(नक्की वाचा- Shivsena List : शिवसेना शिंदे गटाची 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, आदित्य ठाकरेंसमोर 'या' खासदाराचं आव्हान)
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर याच मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमर पाटील यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल किंवा दोन्हीपैकी एकाची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते अशी चर्चा आहे.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित 'केंद्रीय चुनाव समिति' की बैठक में महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस उम्मीदवारों की लिस्ट। pic.twitter.com/F7Hw3SMn3L
— Congress (@INCIndia) October 27, 2024
(नक्की वाचा- 'जरांगे फॅक्टर' मराठवाड्यातल्या एक-दोन जिल्ह्यात मर्यादित, छगन भुजबळांचं टीकास्त्र)
काँग्रेसची चौथी यादी
- अमळनेर - अनिल शिंदे
- उमरेड (अजा) - संजय मेश्राम
- अरमोरी (अज)- रामदास मसराम
- चंद्रपूर(अजा) - प्रवीण पडवेकर
- बल्लारपूर - संतोष सिंग रावत
- वरोरा - प्रवीण काकडे
- नांदेड उत्तर - अब्दुल सत्तार गफुर
- औरंगाबार पूर्व - लहू शेवाळे (मधुकर देशमुखांच्या बदल्यात)
- नालासोपारा - संदीप पांडे
- अंधेरी पश्चिम - अशोक जाधव (सचिन सावंतांच्या बदल्यात)
- शिवाजी नगर - दत्तात्रय बहिरत
- पुणे कँटोन्टेनमेंट (अजा) - रमेश भागवे
- सोलापूर दक्षिण - दिलीप माने
- पंढरपूर - भागिरथ भालके
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world