जाहिरात

Pimpri Chinchwad News: सरकारी रुग्णालयात 'केळवण'चा बेत! पिंपरीतील जिजामाता रुग्णालयातील प्रकार

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता रुग्णालयात चक्क खासगी 'केळवण' जेवणाचा कार्यक्रम आयोजित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Pimpri Chinchwad News: सरकारी रुग्णालयात 'केळवण'चा बेत! पिंपरीतील जिजामाता रुग्णालयातील प्रकार

सूरज कसबे, पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे जिजामाता रुग्णालय हे सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे केंद्र मानले जाते. मात्र, याच रुग्णालयात रुग्णसेवेऐवजी खासगी स्नेहभोजनाची पंगत बसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचे 'केळवण' चक्क हॉस्पिटलच्या आवारात साजरं करण्यात आले. 

नेमका प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याचे लग्न ठरल्याने तिच्यासाठी सहकाऱ्यांनी 'केळवण' (लग्नापूर्वीचे स्नेहभोजन) आयोजित केले होते. या कार्यक्रमात रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी जेवणाचा आस्वाद घेताना दिसले. जिजामाता रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. ज्यावेळी हा कार्यक्रम सुरू होता, त्या वेळी रुग्णसेवेसाठी कर्मचारी उपलब्ध होते का, असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत.

(नक्की वाचा-  Thane News: ठाणेकरांची चिंता वाढली! 3 दिवसांत 6 मुले गायब, नेमकं काय घडतंय?)

प्रशासकीय शिस्तीचे धिंडवडे 

सरकारी कार्यालयात किंवा रुग्णालयात वैयक्तिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी वरिष्ठ प्रशासनाची परवानगी घेतली होती का? रुग्णालय ही 24 तास अत्यावश्यक सेवा देणारी संस्था आहे, तिथे अशा स्वरूपाच्या खासगी कार्यक्रमांना परवानगी देणे नियमात बसते का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच प्रकारामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

(नक्की वाचा-  NDTV Marathi Impact: लेकीला रिक्षात घेऊन फिरणाऱ्या महिलेला शिवसेनेची साथ; 1 लाखांची भेट तर शिक्षणाचा भार उचलला)

चौकशीची मागणी

या घटनेचे फोटो आणि माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com