जाहिरात

खेळताना लहानग्यांनी पाहिलं भयंकर दृश्य; कुत्र्याच्या तोंडात रक्ताने माखलेलं मांस, जवळ जाताच स्थानिक हादरले!

मुंब्रा बायपास जवळील जास्मिन चाळ परिसरात एका नवजात बालकाचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

खेळताना लहानग्यांनी पाहिलं भयंकर दृश्य; कुत्र्याच्या तोंडात रक्ताने माखलेलं मांस, जवळ जाताच स्थानिक हादरले!

रिझवान शेख, प्रतिनिधी

Thane News : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मुंब्रा बायपास जवळील जास्मिन चाळ परिसरात एका नवजात बालकाचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, भटके कुत्रे या नवजात बालकाचा मृतदेह तोंडात धरून फिरत असताना स्थानिकांच्या नजरेस पडले.

कुत्र्याने लहान बाळाचा पाय खाल्ला...

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास जास्मिन चाळ परिसरात काही लहान मुलं गल्लीत खेळत होती. दरम्यान, एक भटक्या कुत्रा एका नवजात बालकाचा मृतदेह तोंडात दाबून धावत असल्याचे या मुलांच्या निदर्शनास आले. मुलांनी तत्काळ याविषयीची माहिती परिसरातील नागरिकांना दिली. स्थानिक रहिवासी मुस्कान यांनी सांगितले की, मुलांनी माहिती देताच मी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. तिथे कुत्र्याने लहान बाळाचा एक पाय खाल्ला होता. आम्ही काही लोकांनी कसाबसा तो मृतदेह कुत्र्याच्या तावडीतून सोडवला. त्यानंतर मी तत्काळ एका कपड्यात तो मृतदेह गुंडाळून ठेवला आणि मुंब्रा पोलिसांना याची कल्पना दिली.

नक्की वाचा - Video : 'त्यांनी भटक्या कुत्र्याचा जीव घेतला'; मराठी अभिनेत्री ओक्साबोक्शी रडली, न्यायाची केली मागणी

पोलिसांकडून तपास सुरू...

सापडलेले नवजात बालक अंदाजे ७ ते ८ महिन्यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे. कोणीतरी हे नवजात बाळ जन्माला आल्यानंतर किंवा मृत झाल्यानंतर गुपचूप येथे आणून फेकले असावे, असं संशय स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे. तर परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठा असल्याने, कुत्र्यानेच हा मृतदेह इतर कुठूनतरी शोधून आणला असावा. हा मृतदेह नेमका कुठून आला? तो कोणी फेकला होता का? की कुत्र्याने तो दुसरीकडून आणला? या सर्व बाजूंचा कसून तपास मुंब्रा पोलिसांच्या माध्यमातून केला जात आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com