धारावी पुनर्विकास योजनेच्या अंतर्गत (Dharavi Redevelopment Project) 53,000 पेक्षा जास्त घरांचं डोर-टू-डोर सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. हा एक रेकॉर्ड आहे. मुंबईतील झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरणाच्या (SRA) इतिहासातील हे सर्वात मोठे सर्वेक्षण आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्प डीआरपीचे सीईओ, एसव्हीआर श्रीनिवास यांनी मुंबईत पत्रकारांची भेट घेतली. त्यांनी यावेळी सर्व आणि सर्व धारावीकरांना या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन केले. ज्यामुळे कुणीही गृहनिर्माण योजनेपासून वंचित राहणार नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नवीन सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, 85,000 झोपडपट्ट्यांचे नंबरिंग पूर्ण झाले आहे. तर, सुमारे 53,000 झोपडपट्ट्यांमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आलंय. धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. धारावीत लोकसंख्येची घनता अधिक असून त्यामध्ये विविधता आहे. या योजनेतील जवळपास 1.5 लाख झोपडपट्ट्याचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे जटीलता आणि आव्हांनाचा विचार केला तर ही एक मोठी उपलब्धी मानली जात आहे.
( नक्की वाचा : Dharavi Project : धारावीतील अनधिकृत बांधकामांवर नजर, 'या' माध्यमातील सर्वेक्षणच प्रमाण मानले जाणार )
कसे होणार पुनर्वसन ?
या टेंडरच्या अटीनुसार धारावीच्या पात्र रहिवाशांचे धारावीमध्ये पुनर्वसन केले जाईल. तर अपात्र रहिवाशांना धारावीच्या बाहेरील परंतु मुंबई महानगर प्रदेशात (MMR) धारावीपासून 10 किलो मीटरच्या परिघात असलेल्या आधुनिक सुविधांसह आधुनिक टाऊनशिपमध्ये स्थलांतरित केले जाईल.
धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत होणाऱ्या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक घर, दुकान, शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांना विशिष्ट ओळख क्रमांक दिला जात आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे धारावीच्या पुनर्विकासाचे नियोजन करण्यात येणार असून त्याआधारे पुनर्वसनाची पात्रता ठरवण्यात येणार आहे.
पुनर्विकास प्रकल्पामध्ये धारावीतील धार्मिक स्थळांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पातील बेकायदेशीर धार्मिक स्थळांचे स्थलांतर किंवा नियमितीकरण करण्यावर समितीचा भर असेल.
धार्मिक वास्तूंचे सर्वेक्षण आणि पुनर्वसन हे एक सामाजिक आव्हान आहे, त्यामुळे ही समिती स्थापन करण्यात आली असून त्यात उपजिल्हाधिकारी आणि निवृत्त न्यायाधीशांचाही समावेश आहे. समितीसोबत बैठकांच्या सुमारे तीन फेऱ्या झाल्या आहेत. ही धार्मिक स्थळे कधी बांधली गेली, एकूण क्षेत्रफळ किती आहे, त्यांचे सर्वेक्षण आणि पुनर्वसन कसे पूर्ण झाले यावर समिती लक्ष केंद्रित करणार आहे. या दाट लोकवस्तीच्या परिसरात 300 हून अधिक धार्मिक स्थळे असून त्यात अनेक अनधिकृत स्थळे असल्याचे सांगण्यात येत आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत, धारावीतील पात्र रहिवाशांना 350 चौरस फुटांचे फ्लॅट मिळणार आहेत. हे फ्लॅट झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांपेक्षा 17% मोठे आहेत. त्यामध्ये स्वयंपाकघर आणि बाथरुमचाही समावेश असेल.
या सर्वेक्षणातून धारावीच्या पुनर्विकासासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे 2-3 लाख कोटी रुपये खर्च येणार आहेत. त्यामध्ये फक्त लोकांच्या पुनरर्वसनासाठी 2-3 लाख कोटी खर्च होणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world