जाहिरात

Dharavi Redevelopment डीआरपीपीएल नाही आता एनएमडीपीएल! धारावी पुनर्विकास प्रकल्प कंपनीच्या नावात बदल

आशिया खंडातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यासाठी धारावी रिडेव्हलमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) नावाची कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीच्या नावात बदल करण्यात आला आहे.

Dharavi Redevelopment डीआरपीपीएल नाही आता एनएमडीपीएल!  धारावी पुनर्विकास प्रकल्प कंपनीच्या नावात बदल
Dharavi Redevelopment Project : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीचा कायापालट या प्रकल्पातून होणार आहे.
मुंबई:

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी मुंबईतील धारावी झोपडपट्टीची ओळख आहे. या झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यासाठी धारावी रिडेव्हलमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) नावाची कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीच्या नावात बदल करण्यात आला आहे. या कंपनीचे नाव आता नवभारत मेगा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड (एनएमडीपीएल) असे झाले आहे. आधुनिक, सर्वसावेशक आणि व्हायब्रंट समुदाय निर्मितीच्या कंपनीच्या ध्येयधोरणानुसार हा बदल करण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नवभारत हे नाव कंपनीच्या विकास, बदल आणि आशा या कट्टीबद्धतेशी सुसंगत आहे. या नावाला संचालक मंडळाची आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची मान्यता मिळाली आहे. हा बदल देशभरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याच्या अवाढव्य आणि ऐतिहासिक कार्याशी संबंधित किंवा लाभार्थी असलेल्या प्रत्येकासाठी एक व्यापक आणि उज्वल भविष्य निर्माण करण्याचा कंपनीचा नवीन दृष्टिकोन आणि दायित्व स्पष्ट करतो. 

नवभारत म्हणजेच 'नवीन भारत' हे नाव या प्रकल्पातील भविष्यकाळ घडवण्याच्या प्रचंड क्षमतेचं प्रतिबिंब आहे. या नावातून या प्रकल्पातून हाती घेण्यात आलेल्या कामाची व्याप्ती आणि परिणाम समजू शकतो. त्याचबरोबर एक संपन्न समुदाय तयार करण्याची कंपनीच्या कटिबद्धतेकडं लक्ष वेधण्यासाठी देखील हे नाव पूरक मानले जात आहे. 

( नक्की वाचा : Dharavi Redevelopment Project : धारावीतील वरच्या मजल्यावरील झोपडीधारकांना मोठा दिलासा )
 

नाव बदलले, कटिबद्धता नाही!

NMDPL ही धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी राज्य सरकार आणि अदानी समुह यांच्या संयुक्त भागीदारीत स्थापन करण्यात आलेली कंपनी आहे. या कंपनीच्या नावात झालेल्या बदलानंतरही सरकारची या कंपनीतील महत्त्वाची भूमिका किंवा प्रकल्पाचा मुळ उद्देश बदलणार नाही.  पारदर्शकता, सर्वसमावेशकता आणि सर्व भागधारकांच्या कल्याणाची खात्रीसह  धारावी पुनर्विकास प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या वचनबद्धतेवर NMDPL ठाम आहे.

या निर्णयाचा उद्देश हा केवळ डीआरपीपीएलचे नाव बदलण्यासाठी नाही. तर त्याच जागेवर असलेल्या सरकारी प्राधिकरणाच्या नाम साधर्म्याशी डीआरपी (धारावी पुनर्विकास प्राधिकरण), या नावाची गफलत होऊ नये हा देखील याचा उद्देश आहे. डीआरपीपीएल हे राज्य सरकारचे धारावीच्या पुनर्विकासाशी संबंधित विशेष नियोजन प्राधिकरण आहे. या प्रकल्पामध्ये राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची आहे.  सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी डीआरपी हे पर्यवेक्षण प्राधिकरण आहे.

( नक्की वाचा : Dharavi Redevelopment अदाणी समूहाचा मोठा विजय, कंत्राटावर आक्षेप घेणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली )
 

आज संपूर्ण देश झोपडपट्टीमुक्त होण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षी ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. धारावीचा पुनर्विकास हे त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या नवीन नावाने, एनएमडीपीएल या राष्ट्रीय उद्देशाची वचनपूर्ती करण्यासाठी एक पाऊल टाकत आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com