जाहिरात

Video: डोंबिवली स्टेशनमध्ये मुंगीही पाय ठेवण्यास घाबरेल इतकी गर्दी, मनसेने केली संसदेत आवाज उठवण्याची मागणी

Badlapur Railway Track Fracture: ट्रेन उशिराने येत असल्याने स्थानकातील गर्दी इतकी वाढली की अनेक प्रवाशांना नाईलाजाने जीव मुठीत धरून दरवाजात लटकत प्रवास करावा लागला.

Video: डोंबिवली स्टेशनमध्ये मुंगीही पाय ठेवण्यास घाबरेल इतकी गर्दी, मनसेने केली संसदेत आवाज उठवण्याची मागणी
मुंबई:

डोंबिवली स्थानकातील वाढत चालले गर्दी हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चालली आहे. मध्य रेल्वे मार्गावर जरा काही घटना घडली की वाहतूक विस्कळीत होते आणि त्याचा फटका प्रवाशांना हमखास बसतो. बुधवारी सकाळी बदलापूरच्या जवळ डाऊन मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेला होता. यामुळे कल्याण ते कर्जत मार्गावर कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनचा दीड तास खोळंबा झाला होता.

( नक्की वाचा: डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ, रस्त्यावरील घाण पाण्यात धुवून सुरु आहे केळ्यांची विक्री )

डाऊन दिशेच्या गाड्यांवर परिणाम झाल्याने सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्यांवरही त्याचा परिणाम झाला. ट्रेन उशिराने येत असल्याने स्थानकातील गर्दी इतकी वाढली की अनेक प्रवाशांना नाईलाजाने जीव मुठीत धरून दरवाजात लटकत प्रवास करावा लागला. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी डोंबिवली स्थानकात बुधवारी सकाळी काय स्थिती होती त्याचे दोन व्हिडीओ पोस्ट केले असून यातून मध्य रेल्वेच्या सेवेची काय हालत झाली आहे याचा सहजपणे अंदाज येऊ शकतो. 

मनसेचे मागणी काय आहे ?

मनसे नेते राजू पाटील यांनी त्यांच्या X पोस्टमध्ये म्हटलंय की,  "आजचे डोंबिवली रेल्वे स्थानकावरचे हे चित्र ! हे रोजचेच आहे. राज्य सरकारला रेल्वे म्हणजे केंद्र सरकारची जबाबदारी वाटते. फार फार एखादी दुर्घटना झाली की ५ लाखाचा चेक घेऊन सत्ताधारी कॅमेऱ्यासहीत तयारही असतात, पण कोणालाही मुंबईकडे जाणाऱ्या या चाकरमान्यांच्या रोजच्या व्यथा दिसत नाहीत. निव्वळ टक्केवारी काढण्यासाठी पटापट होणारे मोठमोठे प्रकल्प हाती घेण्यापेक्षा मुंबई लोकलचे महाराष्ट्राचे स्वायत्त रेल्वेबोर्ड स्थापन करून लोकलसेवा कशी सुधारता येईल यासाठी एक योजना हाती घेणे आवश्यक आहे.

( नक्की वाचा: वाह रे अधिकारी! एकाच दिवशी KDMCचे 3 अधिकारी ACBच्या जाळ्यात )

बिनकामाच्या एक्सप्रेस बंद करा, लोकलला प्राधान्य द्या!

राजू  पाटील यांनी त्यांच्या X पोस्टमध्ये पुढे म्हटलंय की,  "उत्तरेकडून येणाऱ्या व उत्तरेकडे जाणाऱ्या काही बिनकामाच्या मेल-एक्सप्रेस मुंबई बाहेरून सोडल्यास लोकलच्या अधिक फेऱ्या वाढवता येतील.वंदे भारतला दिलेली प्राथमिकता या गोंधळात अधिक भर टाकत आहे अश्याही तक्रारी प्रवासी करत आहेत.  या लोकलने प्रवास करणारे चाकरमनी मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, त्यांची काळजी सरकारने घ्यायलाच हवी."

( नक्की वाचा: क्लासच्या नावाखाली कल्याणमध्ये सुरु होती फसवणूक, मनसेकडून क्लासचालकाला चोप )

'आपण ज्या मुंबईच्या जीवावर देशभरात नंबर एकची जी टीमकी वाजवतो त्या मुंबईला संपन्न करण्यासाठी आपले जीव रोजच धोक्यात घालणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी ही राज्य सरकारची पण आहे. सरकारने केंद्राकडे याबाबत पाठपुरावा करावा. सध्या दिल्लीत अधिवेशन सुरू आहे तिकडे जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी पण याबाबत आवाज उठवावा.' असे पाटील यांनी म्हटले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com