रामराजे शिंदे, नवी दिल्ली
महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या दृष्टीने दिल्लीसह राज्यातही घडामोडी घडत आहे. गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये सहभागी होण्यास तयार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेण्यास तयार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकनाथ शिंदे यांची मनधरणीचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत.
विधानपरिषदेचे सभापती पद मिळावे अशी मागमी देखील एकनाथ शिंदे यांनी केली असल्याची माहिती समोर सूत्रांकडून मिळत आहे. गृह आणि नगरविकास यासह महत्त्वाच्या खाते शिवसेनेला द्यावेत. पालकमंत्रिपद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा, अशी विनंती शिंदेंनी अमित शाहांना केल्याची माहिती मिळत आहे.
(नक्की वाचा- सर्वात मोठा पक्ष मात्र शिंदेंवर भिस्त, भाजपसाठी एकनाथ शिंदे का महत्त्वाचे?)
सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीच्या बैठकीत काय काय झालं?
- मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती.
- अमित शाहांसोबतच्या बैठकीत मंत्रिमंडळाची रचना, खाती वाटप यांच्यावर चर्चा झाल्याची माहिती.
- एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करत मोठी खाती देण्यावर चर्चा.
- एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असाच फॉर्म्यूला निश्चित.
- एकनाथ शिंदेच उपमुख्यमंत्री होणार की इतर कुणी याबाबत अजूनही चर्चाच.
- शिवसेनेनं गृह, नगरविकास तसेच विधानपरिषदेचं सभापतीपद मागितल्याची माहिती.
- शिंदेंच्या सेनेनं एकूण 12 खाती मागितल्याची प्राथमिक माहिती.
- 6 आमदारांमागे एक मंत्रिपद असा खात्यांबाबत फॉर्म्यूला ठरल्याची माहिती.
- गृहमंत्रिपदावरुन भाजप, शिवसेनेत रस्सीखेच, गृहमंत्रिपद देण्यास भाजपचा नकार.
- प्रफुल्ल पटेलांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता.