
ऋतिक गणकवार, मुंबई
Mumbai News : मुंबईतील 125 वर्ष जुना आणि ऐतिहासिक एल्फिन्स्टन पूल (Elphinstone Bridge) 12 सप्टेंबर रोजी रात्री 11.59 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) हा पूल पाडून त्या जागी नवीन ‘डबल-डेकर शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर' उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
पुलाच्या आजूबाजूला असलेल्या इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मुद्दा स्थानिकांनी उपस्थित केल्याने, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यापूर्वीही स्थानिकांनी या ठिकाणी आंदोलने केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूला मोठा बंदोबस्त ठेवला आहे. दंगल नियंत्रण पथकही या ठिकाणी दाखल झाले आहे.
आजपासून पुढील 60 दिवसांत म्हणजेच दोन महिन्यात हा पूल पाडला जाणार आहे. तर पुढच्या 16 महिन्यात पुलाचं पूर्ण करण्याचे लक्ष एमएमआरडीएचं आहे. तर रहिवासांचं म्हाडाच्या इमारतींमध्ये पुनर्वसन केलं जाणार आहे.
(नक्की वाचा- Samruddhi Highway News: समृद्धी महामार्गावर खिळे कुणी ठोकले? MSRDC चं स्पष्टीकरण आलं समोर)
एल्फिन्स्टन पूल बंद झाल्या या भागात प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी अडचण होणार आहे. वाहतुकीच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा पूल मानला जातो. मात्र नागरिकांना आता प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. एल्फिन्स्टन पूल बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे.
(नक्की वाचा- Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वरील '200 पोर्टा केबिन्स' चा दावा खोटा, प्रवाशांच्या गैरसोईची न्यायलयाकडून दखल)
एल्फिन्स्टन पूल बंद, पर्यायी मार्ग कोणते?
- दादर पूर्वकडून पश्चिमेला जाण्यासाठी टिळक पूल वापरावा
- परळ पूर्वकडून प्रभादेवी, लोअर परळला जाण्यासाठी करी रोड पूलाचा वापरा.
- प्रभादेवी, लोअर परळकडून केईएम, टाटा हॉस्पिटलला जाण्यासाठी करी रोड पुलाचा वापर करा.
- परळ, भायखळा पूर्वकडून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड, सी लिंकला जाण्यासाठी चिंचपोकळी पुलाचा वापर करावा.
या नवीन उड्डाणपुलामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे, परंतु पुलाच्या बाजूच्या रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे काही प्रमाणात तणाव दिसून येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world