
BEST bases Route changed because of elphinstone bridge: मुंबईतील सर्वात जुना आणि ऐतिहासिक एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) हा पूल पाडून त्या जागी नवीन ‘डबल-डेकर शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर' उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. एल्फिन्स्टन पूल बंद झाल्याने या भागात प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी अडचण होणार आहे. वाहतुकीच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा पूल मानला जातो. मात्र नागरिकांना आता प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. तसेच हा पूल पाडल्यामुळे बीएसटीच्या बस वाहतूक मार्गातही महत्त्वाचे बदल झाले आहेत.
या बस मार्गात बदल
बेस्ट बस मार्ग क्रमांक १८८: प्रभादेवी पुलाऐवजी मडकेबुवा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भारत माता, संत जगनाडे चौक, कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक, ना. म. जोशी मार्ग, दीपक सिनेमा, परळ एसटी आगार मार्गे धावेल.
बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-१९७: प्रभादेवी पुलाऐवजी मडकेबुवा चौकातून वळण घेऊन हिंदामाता सिनेमामार्गे बस सेवा विस्तारित केली आहे.
बेस्ट बस मार्ग क्रमांक १०१: प्रभादेवी पुलाऐवजी परळ डेपो/संत रविदास चौक वळविण्यात येईल. प्रभादेवी पुलाच्या पाडकामासाठी मध्य पश्चिम रेल्वेला ब्लॉक लागणार आहे. त्यासाठी लवकरच नियोजन करण्यात येईल.
पर्यायी मार्ग कोणते?
दादर पूर्वकडून पश्चिमेला जाण्यासाठी टिळक पूल वापरावा
परळ पूर्वकडून प्रभादेवी, लोअर परळला जाण्यासाठी करी रोड पूलाचा वापरा.
प्रभादेवी, लोअर परळकडून केईएम, टाटा हॉस्पिटलला जाण्यासाठी करी रोड पुलाचा वापर करा.
परळ, भायखळा पूर्वकडून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड, सी लिंकला जाण्यासाठी चिंचपोकळी पुलाचा वापर करावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world