
नागपूर हिंसाचाराबाबत पोलिसांच्या FIR मधून गोष्टी समोर आल्या आहेत. फहीम शमीम खान या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचे एफआयआरमधून समोर आले आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमॉक्रॅटीक पक्षायचा शहराध्यक्ष आहे. नागपूरमधील हिंसाच्याराच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी 51 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. फहीम शमीम खानच्या नेतृत्वात हे सगळं झाल्याचं एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
सोमवारी सगळी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाज प्रतिकात्मक पुतळा जाळून आंदोलन केले. त्याबाबत फहीम खाने याने 40-50 जणांना बेकायदेशीपणे जमा केले. त्यानंर गणेशपेठ पोलीस ठाण्यात लेखी निवेदन दिले. याप्रकरणी पोलिसांनी 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना गुन्हा दाखल करुन घेतल्यानंतर शांतता कायम राखण्याचा आवाहन केले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तरी देखील फहीद खाने याने मुस्लीम धर्मांच्या लोकांना संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास एकत्र जमवून धार्मिक वाद निर्माण होईल ह्या उद्देशाने कट रचला. जवळपास 500 ते 600 मुस्लीम लोक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे जमा झाले. पोलिसांना सर्वांना जमा न होता आपापल्या घरी सुरक्षितरित्या निघून जावे असे आवाहन केले. मात्र जमावातील कुणीही काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.
त्यावेळी जमलेला जमाव एकमेकांना दंगा करण्याची चिथावणी देत मोठमोठ्याने घोषणा देऊ लागले. 'अभी पुलीस को दिखाते है. इनको और किसी भी हिंदू को छोडने का नही. इन्होने ही सारा खेल किया है. इन्होनेही ये सब किया है.' अशी धमकी पोलिसांसमोर जमावाने दिली. त्यानंतर जमाव अधिक प्रक्षोभित झाला.
(नक्की वाचा- Nagpur Violence: संतापजनक! नागपूरमध्ये हिंसक जमावाने घेरलं अन्... महिला पोलिसांसोबत काय घडलं?)
महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न
जमावाने पोलिसांना हाथ-बुक्कीने, दगडाने, घातक शस्त्राने मारहाण करत जखमी केले. बंदोबस्तावरील आरसीपी पथकातील महिला अंमलदार यांना अंधाराचा फायदा घेत लैंगिक भावनेने त्यांना विवस्त्र करण्याच्या उद्देशाने युनिफॉर्मला तसेच शरीराला स्पर्श केला. त्यामुळे त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न झाली. त्यांनी इतरही स्त्रियांना अश्लील शिवीगाळ करत त्यांना लैंगिक भावनेने त्यांच्यावर देखील हल्ला केला. जमावाने काही महिला कर्मचाऱ्यांना पाहून अश्लील इशारे करत अश्लील शेरेबाजी केली, अशीही माहिती FIR मधून समोर आली आहे.
(नक्की वाचा - Nagpur Violence : नागपूर दंगल रोखता आली असती का? पोलिसांचं नेमकं काय चुकलं?)
या कलमांर्तग गुन्हा दाखल
भालदारपुरा, गंजीपेठ, गितांजली चौक, चिटणीस पार्क, नातीक चौक अशा ठिकाणी झालेल्या हिंसाचार प्रकरणी आरोपींविरोधात कलम 45, 49, 50, 61(2), 74, 76, 79, 109, 115(2), 117(2), 117(4), 118 (1), 118(2), 121(1), 121(2), 125, 126(2), 127(2), 132, 135, 189(2), 189(3), 189 (4), 189(5), 189(9), 190, 191(2), 191(3), 192, 195(1), 195(2), 196(1), 197(1), 223, 296, 324(2), 324(3), 324(4), 324(5), 324(6), 326 (एफ), 326 (जी), 351(2), 351 (3), 352, 353(2) बीएनएस सह कलम क्रिमीनल लॉ अमेंडमेट अँक्ट कलम 07, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रति. कायदा कलम 3,4 सह कलम सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम 3, सहकलम स्फोटक पदार्थ अधि 1908 कलम 3, 4, 5 सह कलम 4, 25 भा. ह. का, सहकलम 37 (1), 135 म.पो.का. सह कलम पोलीस (अप्रितीची भावना चेतवणे) अधि. कलम 03 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world