जाहिरात

Ambarnath News : अंबरनाथमध्ये प्रसिद्ध बिल्डरच्या ऑफिसवर गोळीबार; भाजप आमदारावर गंभीर आरोप

Ambarnath Crime News : अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घराच्या गेटवर आज दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता.

Ambarnath News : अंबरनाथमध्ये प्रसिद्ध बिल्डरच्या ऑफिसवर गोळीबार; भाजप आमदारावर गंभीर आरोप

निनाद करमरकर, अंबरनाथ

अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. दोन अज्ञात हल्लेखोरांनी पनवेलकर यांच्या घरावर दोन गोळ्या झाडून पळ काढला. गोळी झाडणाऱ्या आरोपीची ओळख पटल्याचं देखील सूत्रांकडून कळत आहे. मात्र विश्वनाथ पनवेलकर यांनी या प्रकरणी आमदार किसन कथोरेंवर गंभीर आरोप केले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

"माझ्या ऑफिसवरील गोळीबारामागे बदलापूरच्या आमदारांचा हात आहे", असा गंभीर आरोप विश्वनाथ पनवेलकर यांनी आमदार किसन कथोरे यांच्यावर केला आहे. तर मी असले उपदव्याप करत नाही, असं प्रत्युत्तर आमदार कथोरे यांनी पनवेलकर यांना दिलं आहे.

अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घराच्या गेटवर आज दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना चिंचवली इथल्या खदानीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप केला. 

ट्रेंडिंग बातमी - Big news: 'ज्यांना युतीत राहायचंय त्यांनी राहावं, नाही तर बाहेर पडावं' भाजपचे मंत्री कुणावर भडकले?

तसेच काही संशयतांची नावं पोलिसांना दिली असून यामागे बदलापूरच्या आमदारांचा हात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यामुळे या घटनेला वेगळं वळण लागलं आहे. विश्वनाथ पनवेलकर यांनी केलेल्या या आरोपांबाबत आमदार किसन कथोरे यांना विचारलं असता, "चोराच्या मनात चांदणं.. मी असले उपदव्याप करत नाही", असं म्हणत या प्रकरणाची माहिती घेऊन त्यावर प्रतिक्रिया देऊ, असं कथोरे म्हणाले.

ट्रेंडिंग बातमी - Rane vs Rane: 'राणे बंधू एकमेकांच्या उरावर बसणार' माजी खासदार असं का बोलले?

विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार करणारा आरोपी जितेंद्र पवार असल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्याच्यावर २०२३ साली एमपीडीए कायद्यांतर्गत १ वर्षासाठी येरवडा जेलमध्ये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. जेलमध्ये नेताना त्याने पत्रकारांवर दगडही भिरकावला होता. त्यानंतर नुकत्याच भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर झालेल्या तलवार हल्ल्याच्या प्रकरणातही त्याचं नाव आलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली असून अधिकृतरीत्या मात्र अद्याप पोलिसांनी आरोपीबाबत माहिती दिलेली नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com