जाहिरात

Exclusive: 'ही महाराष्ट्राची संस्कृती नाही!', अजित पवारांच्या 'त्या' गैरवर्तनावर माजी DGP संतापले, पाहा Video

 Former Maharashtra DGP  D. Sivanandan on Ajit Pawar  : महाराष्ट्राचे माजी डीजीपी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांनी अंजना कृष्णा यांची उघडपणे बाजू घेतली आहे.

Exclusive: 'ही महाराष्ट्राची संस्कृती नाही!', अजित पवारांच्या 'त्या' गैरवर्तनावर माजी DGP संतापले, पाहा Video
Ajit Pawar : अजित पवार यांनी IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी गैरवर्तन केल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मुंबई:

 Former Maharashtra DGP  D. Sivanandan on Ajit Pawar : आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कथित गैरवर्तन केल्याचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. या प्रकरणाचे सोशल मीडियावर जोरदार पडसाद उमटले. तसंच विरोधकांनीही उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. त्यानंतर अजित पवारांनीही या विषयावर सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत सारवासाव करण्याचा प्रयत्न केला.  महाराष्ट्राचे माजी डीजीपी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांनी अंजना कृष्णा यांची उघडपणे बाजू घेतली आहे.

शिवानंदन यांनी सांगितले की,  महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यांसोबत असा व्यवहार कधीच होत नव्हता. चार वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आणि एका मोठ्या राजकीय घराण्यातील अजित पवार यांनी अशी कृती केल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या अशा अधिकाऱ्याच्या समर्थनासाठी समाजाने पुढे यायला हवे, असेही ते म्हणाले. मुंबईतील अंडरवर्ल्डचा कणा मोडणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून डी. शिवानंदन यांची ओळख आहे. 

काय आहे वादाचे मुळ  कारण?

अजित पवार आणि महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील जोरदार संवादाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये, पवार एका स्थानिक एनसीपी कार्यकर्त्याच्या फोनवरून अधिकाऱ्याला कॉल करून अवैध उत्खननावरील कारवाई थांबवण्याचे निर्देश देताना दिसले. व्हिडिओमध्ये कृष्णा फोनवर बोलत होत्या, ज्यात समोरून 'मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय' असे सांगण्यात आले. त्यांनी त्या कृष्णा यांना दम देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकीही दिली होती. पण त्यानंतर अजित पवार यांनी त्यांचा हेतू कायद्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर परिस्थिती आणखी बिघडू नये याची खात्री करणे होता असे स्पष्टीकरण दिले.

( नक्की वाचा : Ajit Pawar Video : अजित पवारांनी अखेर मौन सोडले; महिला अधिकाऱ्यासोबतच्या वादावर दिलं स्पष्टीकरण, म्हणाले... )
 

कोण आहेत अंजना कृष्णा?

अंजना कृष्णा, 2022-23 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्या सध्या सोलापूरच्या करमाळा येथे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) पदावर कार्यरत आहेत. त्यांची प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा सध्या राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. या घटनेनंतर एका बाजूला विरोधी पक्ष, विशेषतः शिवसेना (उद्धव गट), यांनी अजित पवार यांच्यावर खाण माफियांच्या संरक्षणाचा आरोप केला आहे, तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या बेशिस्तपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता अजित पवारांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी यूपीएससीकडे आयपीएस अधिकाऱ्याच्या कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी केल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com