मंगेश जोशी, प्रतिनिधी
Central Railway GM Vijaykumar Passes Away : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (GM) विजयकुमार यांचं झोपेतच निधन झाल्याचं समोर आलं आहे. आज (११ नोव्हेंबर २०२५) पहाटे झोपेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं. झोपेतच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. विजयकुमार यांचे वयाच्या 56 व्या वर्षी अकाली निधन झाल्याने रेल्वे विभागात शोककळा पसरली आहे
विजयकुमार हे इंडियन रेल्वे मेकॅनिकल इंजिनिअरिंग (IRSME) 1988 बॅचचे अधिकारी होते. 1 ऑक्टोंबर 2025 रोजी त्यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक (GM) पदाचा पदभार स्वीकारला होता. तसेच चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्सच्या महाव्यवस्थापक पदाची ही त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. या काळात त्यांनी लोकोमेटिव्ह उत्पादनात विक्रम प्रस्थापित केला होता. तसेच उत्तर रेल्वे, उत्तर पश्चिम रेल्वे, रेल्वे बोर्ड, रेल्वे विभागातील आरडीएसओ तसेच नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन मध्येही त्यांनी यशस्वी कामगिरी केली होती.
नक्की वाचा - Kalyan News: कल्याणमध्ये भर रस्त्यात तरुणांची दारु पार्टी, धक्कादायक Video Viral
विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या विकासासाठी विविध 20 देशांपेक्षा अधिक देशातील रेल्वेचा त्यांनी अभ्यास दौराही केला होता. विजयकुमार त्यांच्या अकाली निधनामुळे रेल्वे विभागात मोठी पोकळी निर्माण झाली असून रेल्वे विभागातील शांत व शिस्तप्रिय व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world