जाहिरात

Gold Price: सोन्याच्या दरात जून महिन्यात मोठी घसरण, चेक करा सोन्याचे लेटेस्ट दर

Gold Silver Rates : इस्रायल आणि इराणने युद्धबंदी मान्य केल्यापासून सर्वात जास्त घसरण दिसून आली. युद्धबंदीनंतर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 3,490 रुपयांची घसरण झाली. 

Gold Price: सोन्याच्या दरात जून महिन्यात मोठी घसरण, चेक करा सोन्याचे लेटेस्ट दर

Gold Silver Rates : जून महिन्यात सोन्याच्या दरात बरीच घसरण पाहायला मिळाली. जून महिन्याच्या अखेरच्या दिवशी देखील सोन्याच्या किमतीत घसरण झालेली दिसली. इस्रायल आणि इराणने युद्धबंदी मान्य केल्यापासून सर्वात जास्त घसरण दिसून आली. युद्धबंदीनंतर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 3,490 रुपयांची घसरण झाली. 

(नक्की वाचा- NPS vs Mutual Fund SIP: सेवानिवृत्ती नियोजनेसाठी काय चांगले? अधिक परतावा कुठे मिळेल?)

30 जून रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 20 ग्रॅममध्ये 150 रुपयांनी घसरून 89,150 रुपयांवर आला. दरम्यान, 24 कॅरेट सोन्याचा भाव 160 रुपयांनी घसरून 97,260 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. 23 जूनपासून सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. 23 जून ते 30 जून या कालावधीत, 24 कॅरेटमधील 10 ग्रॅम सोन्याच्या किमती 3490 रुपयांनी घसरल्या आहेत.

(नक्की वाचा- Investment News: बाजाराने दिलेत सुपर तेजीचे संकेत, आत्ता गुंतवणूक करावी का?)

चांदीच्या दरातही घसरण

30 जून रोजी चांदीचा भाव 1,07,700 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता. सोमवारच्या तुलनेत चांदीचा दर 100 रुपयांनी कमी झाला आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com